राज्यात डिजिटल सातबारा उताराचा नवा उच्चांक

दिवसात एक लाख सातबारा डाऊनलोड : सर्वाधिक ३१ लाखांचा महसूल जमा
Digital_Satbara
Digital_Satbara
Updated on

पुणे : राज्यातील डिजिटल सातबारा उताराचा सोमवारी (ता.५) नवा उच्चांक नोंदला गेला आहे. एकाच दिवसात १ लाख सातबारा उतारे डाउनलोड झाल्याने हा नवा विक्रम झाला आहे. यामुळे एका दिवसात सर्वाधिक ३१ लाख ५० हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

शेतकऱ्यांना घरबसल्या आॅनलाइन सातबारा उतारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने महसूल विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा उतारा ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच्या जोडीलाच महसूल विभागाच्या अनेक सेवा ऑनलाइन केलेल्या आहेत. या सुविधांमुळे सामान्य शेतकऱ्यांच्या जमीनविषयक आणि सातबाराबाबतच्या अनेक समस्या दूर झाल्या आहेत.

Digital_Satbara
''हे सरकार झोपले आहे का?'' अमित ठाकरेंनी घेतली स्वप्निलच्या कुटुंबियांची भेट

राज्य सरकारने डिजिटल स्वाक्षरीत सातबारा, खाते उतारे आणि मिळकत पत्रिका ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी महाभूमी पोर्टल सुरू केले आहे. हे पोर्टल सध्या सर्वच खातेदारांच्या पसंतीस उतरल्याचे दिसून येत आहे.

Digital_Satbara
राज्य लोकसेवा आयोगातील 15 हजार 515 रिक्त पदे भरण्यास मंजुरी

- एका दिवसातील

  • ऑनलाइन दस्त नोंदणीची संख्या – ४५३१

  • ऑनलाइन फेरफार संख्या – १२१३२

  • ऑनलाइन निर्गत फेरफारची संख्या – १००६३

  • नोटीस तयार केलेल्या फेरफारची संख्या – ११०१३

  • तलाठी स्तरावरून अभिलेख वितरण प्रणालीतून वितरीत सातबारा व खाते उतारे संख्या- २ लाख ८६ हजार ५८०.

  • पीक कर्जासाठी बँकांनी घेतलेल्या ऑनलाइन सातबारा व खाते उतारे संख्या - १० हजार.

  • पीक विमा योजनेसाठी वापरलेल्या सातबाराची संख्या – १ लाख ३४ हजार.

  • भूलेखवरून मोफत मिळविलेल्या सातबारा - ५ लाख २ हजार.

  • एका दिवसात नक्कल शुल्कद्वारे जमा झालेला महसूल - ३१ लाख ५० हजार रूपये.

''महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रकल्पाला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. यामागे राज्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल अधिकारी यांचे कठोर परिश्रम आहेत. ''

- रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी व राज्य समन्वयकई- फेरफार प्रकल्प, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com