Nitesh Rane : हे पाऊल हिंदुत्वाला बळकटी देणारे : आ. नितेश राणे

या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई आणि उप अधीक्षक स्वप्नील जाधव यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली होती.
नितेश राणे
नितेश राणे sakal
Updated on

दौंड : दौंडचे पोलिस उप अधीक्षक स्वप्नील जाधव हे सातत्याने हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेत होते. त्यांची बदली झाल्याने शासनाने उचललेले पाऊल योग्य अतिशय योग्य आणि हिंदुत्वाला बळकटी देणारे आहे, असे विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

नितेश राणे
Nashik News : खळबळजनक! प्रेमसंबंधातून महिलेने घेतली मनगटाची नस कापून; सातपूर पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल

पुणे जिल्ह्यातील दौंड उपविभागाचे उप अधीक्षक स्वप्नील जाधव यांची अवघ्या तेरा महिन्यातच सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे बदली झाली आहे. केडगाव (ता. दौंड) येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन मधील दोन मुलींचे बळजबरीने धर्मांतर झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असताना सर्व संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात आली नाही. पोलिसांकडून अप्रत्यक्ष पध्दतीने संस्थेला संरक्षण आणि संस्थाचालकांचे लाड केले जात असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी विधान भवनात केला होता. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई आणि उप अधीक्षक स्वप्नील जाधव यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली होती.

नितेश राणे
Sangli News : ‘सरळ सेवा भरती’अंतर्गत ४२ जणांना नियुक्ती

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उप अधीक्षक यांच्या कार्यपध्दतीविषयी आणि दौंड तालुक्यात वाढत असलेली गोहत्या, गोमांस विक्री आणि वाहतूक प्रकरणी तक्रारी झाल्या होत्या. फेब्रुवारी २०२४ मध्ये कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसी मधील एका कंपनीतून पुणे पोलिसांच्या पथकाने बाराशे कोटी रूपये मूल्य असलेला ६०० किलो मेफेड्रोन या अमली पदार्थाचा साठा जप्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर बदलीची मागणी जोर धरत होती. सातत्याने तक्रारी झाल्याने त्यांची ३ जुलै रोजी रात्री एका आदेशाद्वारे बदली केली. स्वप्नील जाधव यांची विनंती बदली असल्याचे समजते. दरम्यान बदली झाल्याने ८ जुलै रोजी दौंड येथील कार्यालयात स्वप्नील जाधव यांनी नूतन उप अधीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्याकडे पदभार सोपविला.

अशा मोजक्यांमुळे गृह खात्याचे नाव खराब

आमदार नितेश राणे यांना या बाबत विचारले असता ते म्हणाले, ` उप अधीक्षक हे सातत्याने हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेत होते आणि अप्रत्यक्ष पध्दतीने जिहादींना मदत करण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्याविषयी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. आम्हाला असे वाटते की, काही मोजक्या अधिकार्यांमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह खात्याचे नाव खराब होते. अशांवर कारवाई होणे गरजेची होती , म्हणून बदली करून उचललेले पाऊल अतिशय योग्य आहे. `

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com