शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन गुरुवारी होणार

मिलिंद संगई
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

बारामती : मराठा आरक्षण आंदोलनाच्या वतीने गुरुवारी (ता. 9) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.

आज संयोजकांच्यावतीने ही माहिती देण्यात आली. पवार यांच्या माळेगाव रस्त्यावरील गोविंदबाग या निवासस्थानासमोर सकाळी नऊ ते बारा असे तीन तास हे ठिय्या आंदोलन होणार आहे. 
 
शासनाने आरक्षण देण्यासाठी समाजबांधवांचा अंत पाहू नये असे आवाहनही या वेळी करण्यात आले आहे. दरम्यान आजही नगरपालिकेसमोर मराठा समाज बांधवांचे ठिय्या आंदोलन सुरुच होते. 

Web Title: Thiyya agitation will be held before Sharad Pawar's residence on Thursday