राज्यघटनेवर श्रद्धा असणाऱ्यांनी एकत्र यावे - स्वामी अग्निवेश 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

पुणे - ‘‘सरकार आणि त्यांच्या धोरणांवर टीका करणाऱ्यांवर आज देशद्रोही असा शिक्का मारला जात आहे. त्यामुळे राज्यघटनेवर श्रद्धा असणाऱ्यांनी एकत्र येणे, ही आजच्या काळाची गरज आहे,’’ असे विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी रविवारी येथे सांगितले. 

‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ व ‘संविधान समर्थक परिवर्तनवादी संघटना’ यांच्यातर्फे आयोजित केलेल्या ‘धार्मिक दहशतवाद व असहिष्णुता’ या विरोधातील राज्यस्तरीय संकल्प परिषदेमध्ये ते बोलत होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, ‘पीपल्स रिपब्लिकन पार्टी’चे नेते आमदार जोगेंद्र कवाडे, राज्य सचिव मिलिंद देशमुख, माधव बागवे, सुशीला मुंडे आणि ठकसेन बोजहाडे आदी उपस्थित होते. 

स्वामी अग्निवेश म्हणाले, ‘‘संसदीय राजकारणाच्या माध्यमातून सरकारचा पराभव केला पाहिजे. प्रश्‍न विचारणे म्हणजे देशद्रोह करण्यासमान मानले जाते. इंग्रज राजवटीत सुरू केलेली पद्धत अवलंबून सरकार इथल्याच लोकांना देशद्रोही ठरवत आहे.’’

Web Title: Those who believe the Constitution should come together says Swami Agnivesh