समाजकार्य करणाऱ्यांचा गौरव गरजेचा - वाघमारे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

पुणे - 'गरजू विद्यार्थ्यांसाठी आधार शैक्षणिक संस्था करीत असलेले कार्य कौतुकास्पद असून, समाजात केलेल्या समाजकार्याचा गौरव होणे गरजेचे आहे,''असे गौरवोद्‌गार ज्येष्ठ साहित्यिक, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहिदास वाघमारे यांनी पुण्यात काढले.

पुणे - 'गरजू विद्यार्थ्यांसाठी आधार शैक्षणिक संस्था करीत असलेले कार्य कौतुकास्पद असून, समाजात केलेल्या समाजकार्याचा गौरव होणे गरजेचे आहे,''असे गौरवोद्‌गार ज्येष्ठ साहित्यिक, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहिदास वाघमारे यांनी पुण्यात काढले.

योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा अखिल भारतीय "प्रतिभा सन्मान' पुरस्कार यंदा राष्ट्रीय फेडरेशन मानवाधिकार परिषदेचे राजेश भोसले, ललेश भिंगारे, उपाध्यक्ष सतीश केदारी, अशोक शिंदे, पूनम कांबळे यांना देण्यात आला. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहिदास वाघमारे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी माजी खासदार मोहन जोशी, माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, सुरेशचंद्र सुरतवाला, बाळासाहेब धवर, कैलास बारणे, वर्षा चासकर आदी उपस्थित होते.

मूळचे नगरच्या पारनेर तालुक्‍यातील म्हस्केवाडीतील रहिवासी असलेले शिंदे यांनी मानवाधिकार सामाजिक न्याय आणि मानव अधिकाराचे काम समाजात पोचविण्याचे कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. तसेच आधार शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून राज्यातील अनेक गरजू संस्थेत शालेय विद्यार्थ्यांनाही त्यांनी मदत केली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी या संस्थेने विशेष परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान या पुरस्कारातून करण्यात आला.

शिंदे म्हणाले, 'या पुरस्कारातून स्फूर्ती घेऊन या पुढील काळात अधिक जोमाने कार्य करीत राहू.'' या वेळी मान्यवरांची मनोगते झाली.

Web Title: Those who do social work need pride