Amitesh Kumar : व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करणार

पुणे शहरातील व्यापाऱ्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून त्रास दिला जात आहे.
Pune Police Commissioner Amitesh Kumar
Pune Police Commissioner Amitesh Kumarsakal

पुणे - शहरातील व्यापाऱ्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून त्रास दिला जात आहे. तसेच, माथाडी कामगारांच्या नावाखाली व्यापाऱ्यांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी पुणे शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे करण्यात आली. त्यावर माथाडीच्या नावाखाली व्यापाऱ्यांना लुटणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाईल, असे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले.

पुणे शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश जैन यांच्यासह शिष्टमंडळाने नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची गुरुवारी (ता. ८) भेट घेतली. या वेळी व्यापारी असोसिएशनतर्फे अमितेश कुमार यांना सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

‘शहरात माथाडीच्या नावाखाली व्यापारी वर्गाची लुबाडणूक होत आहे. गुन्हेगारांकडून व्यापाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण केला जात आहे. व्यापाऱ्यांशी संबंधित प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी त्यावर तत्काळ उपाययोजना कराव्यात,’ अशी मागणी जैन यांनी केली.

त्यावर ‘‘गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. गुन्हेगारांना समज देण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांना गुन्हेगारांकडून त्रास झाल्यास त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येईल,’ असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी निखिल जैन, सिद्धार्थ जैन, दीपक जैन, वसंत जैन, दिलीप बलकवडे, मेहूल ओसवाल, राकेश जैन, विनायक शिंदे, सुरेश चौधरी, अशोककुमार सारडा, निखिल पाटील, हसमुख जैन, चंपालाल जैन आदी या वेळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com