लाच प्रकरणात वकिलास जीवे मारण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

पुणे  : जमिनीबाबतचा निकाल आपल्या बाजूने देण्यासाठी भूमी अभिलेख उपसंचालकाकडुन पावणे दोन लाख रुपये लाच स्विकारण्याच्या प्रकरणात तक्रार देणाऱ्या वकीलास पिस्तुलाचा धाक दाखवुन जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबतची तक्रार बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. 

पुणे  : जमिनीबाबतचा निकाल आपल्या बाजूने देण्यासाठी भूमी अभिलेख उपसंचालकाकडुन पावणे दोन कोटी रुपये लाच स्विकारण्याच्या प्रकरणात तक्रार देणाऱ्या वकीलास पिस्तुलाचा धाक दाखवुन जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबतची तक्रार बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. 

अॅड. उमेश चंद्रकांत मोरे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांच्यासाठी अॅड. रोहित शेंडे याने पावणे दोन कोटी रुपयांची लाच स्विकारली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेंडे यास अटक केल्यानंतर वानखेडे विरुद्ध ही गुन्हा दाखल केला होता. वानखेडे सध्या उपचार घेत असुन त्यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

दरम्यान, या प्रकरणामध्ये तक्रार देणाऱ्या मोरे यांना दोघानी पिस्तुलचा धाक दाखवुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The threat of killing the lawyer in the bribe case