मिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबीयांना धमकीचे पत्र

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

पुणे : कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी अटकेत असलेल्या मिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबीयांना धमकीचे पत्र आले आहे. "एकबोटे फॅमिलीला तोफेच्या तोंडी द्या आणि एन्काऊंटर करा' अशा स्वरूपाचा आशय संबंधित पत्रामध्ये असून त्याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोरेगाव भीमा दंगलीच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी एकबोटे यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले जात असताना एकाने त्यांच्या तोंडावर शाई फेकण्याचा प्रकार केला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

ही घटना ताजी असतानाच एकबोटे यांच्या शिवाजीनगर येथील घरी एक पत्र आले. त्यामध्ये एका वृत्ताच्या बातमीखाली ठळक अक्षरामध्ये "एकबोटे फॅमिलीला तोफेच्या तोंडी द्या आणि एन्काऊंटर करा' असा मजकूर लिहिलेला आढळून आला.

या प्रकारची गांभीर्याने दखल घेऊन एकबोटे यांचे बंधू गजानन एकबोटे यांनी तत्काळ शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Threats for Milind Ekbote family