तेरा वर्षानंतर सबळ पुराव्या अभावी खुनाच्या आरोपातून तिघांची निर्दोष मुक्तता

डी. के. वळसे पाटील
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

मंचर : पैशाच्या देण्या-घेण्याच्या कारणावरून रविशंकर बाळकृष्ण मेरूकर (वय ४२, रा. बावधन) यांना गुंगीचे औषध पाजून, गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर हात-पाय तोडून, मृतदेह अर्धवट जाळून पोत्यात भरून शेल पिंपळगाव-चाकण रस्त्यावरील घोलपवाडी (ता.खेड) येथील नाल्यात टाकून पुरावा नष्ट केला. असा आरोप होता. हि घटना तेरा वर्षापूर्वी घडली होती. या प्रकरणी सबळ पुराव्या अभावी महिलेसह तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. राजगुरुनगर (ता. खेड) येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन के ब्रम्हे यांनी याबाबतचा निकाल नुकताच दिला आहे.

मंगल विठ्ठल लोखंडे (वय ५०), स्वप्निल विठ्ठल लोखंडे (वय ३५), नितीन अर्जून जुनावणे (वय ३०, सर्व रा. भीमा टाक़ळी, ता. शिरूर) अशी निर्दोष मुक्तता झालेल्याची नावे आहेत. या प्रकरणात बचाव पक्षातर्फे अॅड.गोरक्षनाथ काळे, अॅड. गणेश जाधव, अॅड. सचिन तांबे (सर्व राजगुरुनगर) व अॅड. सरिता काजळे  (मंचर) यांनी काम पाहिले.

मेरूकर यांच्या खूनाचा तिघांवर आरोप होता. ९  डिसेंबर २००५ मध्ये मेरूकर यांच्या खुनाची घटना घडली. आरोपींनी पैशाच्या वादातून मेरूकर यांचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचा मृतदेह पोत्यात भरून शेल पिंपळगावहून चाकणकडे जाणाऱ्या रस्तावरील ओढ्यात फेकून दिला होता. या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्ह्यातील मृतदेह हा कोणाचा आहे, हे सिध्द होऊ शकले नाही.
त्याचप्रमाणे पोस्टमार्टम रिपोर्टवरून मयतचा अपघाती मृत्यू झाला. की त्याने आत्महत्या केली अथवा त्याला कोणी मारहाण केली, हे सिध्द होत नाही. प्रत्यक्ष अथवा कोणताही परिस्थितीजन्य पुरावा नाही, असा युक्तीवाद अॅड. गोरक्षनाथ काळे व त्यांच्या सहकार्यांनी केला होता. त्यानुसार न्यायालयाने तिघांची निर्दोष मुक्तता केली.

Web Title: three acquitted of murder charges after thirteen year