esakal | रेमडेसिवीरची वाढीव दराने विक्री, खोपोली येथील तीघांना अटक

बोलून बातमी शोधा

crime

रेमडेसिवीरची वाढीव दराने विक्री, खोपोलीतील तीघांना अटक

sakal_logo
By
रवींद्र पाटे

नारायणगाव : कोरोना बाधितांवरील उपचारासाठी वापरले जाणारे रेमडेसिव्हिर इंजेक्शनची वाढीव दराने व अवैध मार्गाने विक्री करणाऱ्या खोपोली येथील तीन तरूणांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून नऊ इंजेक्शन जप्त केली आहेत.अटक आरोपी पैकी एक आरोपी खोपोली येथे कोविड उपचार केंद्र चालवणाऱ्या डॉक्टरचा नातेवाईक आहे.आरोपींना जुन्नर न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली . या प्रकरणी स्वप्निल सुनिल देशमुुख (गुरव) (वय १९ ), आकाश प्रकाश कलवार,( वय २५),विनोद जगदीशप्रसाद जाकोटीया( वय ४० सर्व राहणार खोपोली ता.खालापुर, जि. रायगड ) यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: नारायणगाव : खेबडेमळा शिवारात विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

या बाबत सहायक पोलिस निरीक्षक ताटे म्हणाले पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा विभागाच्या पथकाने २४ एप्रिल २०२१ रोजी वारूळवाडी (ता. जुन्नर) येथे अवैध मार्गाने कोणताही परवाना नसताना रेमडेसिव्हिर इंजेक्शनची पंचेचाळीस हजार रुपयांना विक्री करीत असताना रोहन शेखर गणेशकर (वय २९, रा. वाणेवाडी, ता. जु्न्नर ) या तरुणाला अटक केली होती.त्याच्याकडून तीन इंजेक्शन, मोबाईल असा २१ हजार ८९० रूपयांचा ऐवज जप्त केला होता.पुढील तपासात रोहन गणेशकर याने रेमडेसिव्हिर इंजेक्शनची खरेदी खोपोली येथील सदर आरोपींकडून २५ हजार रुपयांना एक या प्रमाणे केल्याची माहिती मिळाली. त्या नुसार गुरूवारी (ता. २९) रात्री खोपोली येथून स्वप्निल देशमुुख, आकाश कलवार, विनोद जाकोटीया यांना ताब्यात घेतले. चौकशीत गरजूंना व रुग्णांच्या नातेवाईकांना आरोपी रेमडेसिव्हिर इंजेक्शनची २५ हजार रुपयांना एक या प्रमाणे विक्री करत असल्याचे व रोहन गणेशकर याला इंजेक्शनची विक्री अवैध मार्गाने केल्याचे निष्पन्न झाले. या वरून आरोपींना अटक करण्यात आली.

आरोपींकडून नऊ इंजेक्शन जप्त करण्यात आली. प्राथमिक चौकशीत विनोद जाकोटीया याचा खोपोली येथे सिमेंट विक्रीचा व्यवसाय असून त्याच्या नातेवाईक असलेल्या डॉक्टरचे खोपोली येथे कोविड उपचार केंद्र आहे. पुढील तपासात आरोपी रेमडेसिव्हिर इंजेक्शनची खरेदी कोठुन करत होते हे निष्पन्न होणार आहे. या टोळीत काही डॉक्टरचा सहभाग असल्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक देशमुख, अपर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, धनंजय पालवे, शैलेश वाघमारे, सचिन कोबल यांचे पथकाने केली.

दरम्यान, या टोळीने, अन्य औषध विक्रेते, डॉक्टर अथवा अन्य व्यक्तिंनी रुग्णाच्या असहायतेचा फायदा घेऊन अवैध मार्गाने अजुन कोणाला रेमडेसिवीरची विक्री केली असेल तर संबंधित व्यक्तींनी नारायणगाव पोलिस ठाण्यात (मोबाईल क्रमांक ९९२२४४८१००) संपर्क साधावा. माहिती देणाराचे नाव गुप्त ठेवले जाईल. -पृथ्वीराज ताटे, (सहायक पोलिस निरीक्षक)

हेही वाचा: पुणे स्मार्ट सिटीतर्फे ६३ प्रकल्पांवर काम  सुरू