पिस्टल हवेत रोखून दुकानदारांत दहशत पसरविणारे तिघे जेरबंद | Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pistol
पिस्टल हवेत रोखून दुकानदारांत दहशत पसरविणारे तिघे जेरबंद

पिस्टल हवेत रोखून दुकानदारांत दहशत पसरविणारे तिघे जेरबंद

उंड्री - हवेत पिस्टल रोखत दुकान बंद कर, मला ओळखत नाही का, एकाला वर पोहोचवले आहे, आता तुझा नंबर लावू का, असे म्हणत शिवीगाळ तिघांना जेरबंद केले. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भेकराईनगरमधील शिवशंकर हाईट्स परिसरात ही घटना घडली.

शुभम रमेश कवडे, संजय राजेंद्र पवार, विशाल दादा शिंदे असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. याप्रकरणी मयूर मधुकर यादव (वय ३०, अॅस्ट्रिया ग्रॅन्ड सोसायटी, हांडेवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: बारामतीत पुन्हा एकदा वेश्याव्यवसायावर कारवाई

पोलिसांनी सांगितले की, आरोपी शुभम कवडे, संजय पवार, विशाल शिंदे यांनी बुधवारी (दि. २४ नोव्हेंबर २०२४) दुपारी साडेतीनच्या सुमारास शिवशंकर हाईट्स, ढमाळवाडी, भेकराईनगर परिसरात हवेत पिस्टल रोखून मादरचोद दुकान बंद कर, मला ओळखत नाही का, दुकान बंद कर, मी सांगितल्याशिवाय दुकान उघडायचे नाही, आधीच एकाला वर पोहोचवला आहे. त्यात आता तुझा नंबर लावून घेऊ नको, असे ओरडत दुकानदारांना शिवीगाळ करीत परिसरात दहशत निर्माण केली. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे, राजू अडागळे, सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने करीत आहेत.

loading image
go to top