कर्जाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पुणे - कर्ज देण्याचे आणि ओएलएक्‍सवर वस्तू भाड्याने घेण्याचे आमिष दाखवून काही नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेने तिघांना अटक केली. संबंधित आरोपींनी आत्तापर्यंत फसवणुकीचे आठहून अधिक गुन्हे केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. 

पुणे - कर्ज देण्याचे आणि ओएलएक्‍सवर वस्तू भाड्याने घेण्याचे आमिष दाखवून काही नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेने तिघांना अटक केली. संबंधित आरोपींनी आत्तापर्यंत फसवणुकीचे आठहून अधिक गुन्हे केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

सूरज किसन माने (वय 32, रा. कात्रज), मंगेश अशोक माने (वय 24, रा. मांगडेवाडी, कात्रज), स्वप्नील तेजेंद्र ठाकूर ( वय 29, म्हाडा कॉलनी, पिंपरी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी जसबीरसिंग सेहगल (वय 28, रा. टिंगरेनगर) यांनी सायबर शाखेकडे फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेहगल यांना कोटक महिंद्रा बॅंकेतून बोलत असल्याचे भासवून वैयक्तिक कर्ज देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी कागदपत्रे, पंधरा हजार रुपयांचा धनादेश दिला. त्यानंतर त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

दरम्यान, याच पद्धतीने आणखी दोघांची 50 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारअर्ज सायबर शाखेकडे आले. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अनिता पवार यांनी तपास केल्यानंतर सूरज, मंगेश व स्वप्नील यांनी हा प्रकार केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिस निरीक्षक राधिका फडके यांच्या मार्गदर्शनाखाली अनिता पवार, पोलिस कर्मचारी पूजा डहाळे, आदेश चलवादी, भूषण शेलार, नितीन चांदणे, राहुल हंडाळ यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लॅपटॉप, 6 मोबाईल, 10 सिम कार्ड, आधार कार्ड, डेबिट कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

Web Title: Three arrested for fraud by showing loan bait