कोरोनाबाधीताचे प्राण वाचविण्याची ‘त्रिसूत्री’; व्हेंटिलेटर गरज असेल तेव्हाच!

three-best-ways-to-survive
three-best-ways-to-survive
Updated on

पुणे - लवकर अचूक निदान, ऑक्सिजन आणि योग्य प्रभावी उपचाराची निवड ही कोरोना रुग्णाचे प्राण वाचविण्याची त्रिसूत्री आहे, असे आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञांनी शनिवारी वेबिनारमध्ये सांगितले. 'सकाळ', 'इंडियन सोसायटी ऑफ क्रिटीकल केअर मेडिसीन'ची (आयएससीसीएम) पुणे शाखा आणि 'यंग प्रसिडेंटस् ऑर्गनायजेशन' (वायपीओ) यांच्यातर्फे हा वेबिनार आयोजित करण्यात आला.

तुर्कस्थानातील अंकारा येथील हेसेट्टेपे विद्यापीठात बालरोग अतीदक्षता विभागातील डॉ. बेनन बायराकी वेबीनारमधील प्रमुख वक्ते होते. 'आयएससीसीएम'चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कपिल झिरपे आणि डॉ. सुभाल दीक्षित यांच्यासह 'आयएससीसीएम' पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. कपिल बोरावके आणि न्यूयॉर्कमधील लेनॉक्स हिल्स हॉस्पिटलच्या संचालक ग्युनेस आयोक यात सहभागी झाले. 'वायपीओ गोल्ड साउथ एशिया' प्रादेशिक अध्यक्ष वागेश दीक्षित मॉडरेटर होते. अतिदक्षता विभागाची जबाबदारी असलेले महाराष्ट्रातील वैद्यकीय तज्ज्ञ वेबिनारमध्ये सहभागी झाले. डॉ. बायराकी म्हणाले, "कोरोना विषाणूंच्या विरोधात जगभर युद्ध सुरू आहे. श्वसनमार्गातून आक्रमण करणाऱया या विषाणूंना एकच एक अस्त्र वापरून पराभूत करता येत नाही, हे आतापर्यंत जगभरात दिसून आले आहे. त्या योग्य वेळी योग्य अस्त्र म्हणजेच योग्य औषधोपचार, उपचार पद्धती याचा डाँक्टरांनी प्रभावी वापर करण्याची गरज आहे." रुग्ण अत्यवस्थ होण्यापूर्वीच त्याच्यावर प्रभावी उपचार पद्धतींचा वापर केला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोनामुळे काय होते?
कोरोना फुफ्फुसाचा आजार आहे. यात ऑक्सिनेशन आणि व्हेंटिनेशन या उपचार पद्धती महत्त्वाची भूमिका बजावतात. या विषाणूंच्या संसर्गामुळे शरिरातील इतर अवयवांना पुरेशा प्रमाणात प्राणवायू मिळत नाही. त्याचा थेट परिणाम अवयवांच्या कार्यक्षमतेवर होतो, हे टाळण्याची सूत्रे डॉ. बेनन यांनी त्यांच्या सादरिकरणात सांगितले.

डॉ. बेनन यांचे 4 सल्ले
न्यूमोनिया, रक्ताच्या गुठळ्या आणि संसर्गावर शरीर प्रतिहल्ला करते.
प्रतिहल्ल्याच्या स्वरुपानुसार उपचार पद्धतीची निवड करावी लागते.
रुग्ण व्हेंटीलेटवर जाणार नाही याची काळजी घ्या; त्यासाठी लवकर ऑक्सिजन थेरपी द्या
रुग्णाचा श्वास वाढला, हा रुग्णाला व्हेंटीलेटवर ठेवण्याचा निकष नाही

विषाणूंमुळे शरीरात नेमके कोणते बदल झाले, हे समजून लवकर प्रभावी उपचार केल्यास व्हेंटीलेटवर जाणाऱया रुग्णांचे प्रमाण निश्चित कमी होईल. त्यामुळे रुग्णाच्या जीवाचा धोका टाळण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना यश येईल.
- डॉ. कपिल झिरपे, माजी अध्यक्ष, आयएससीसीएम

सर्दी, खोकला झाल्यास लपवू नका. जवळच्या डॉक्टरांना दाखवा. लवकर उपचार केल्यास कोरोनाचे रुग्ण खडखडीत बरे होतात. कोरोनाच्या मृत्यूदर हा 2 ते 3 टक्के आहे.
- डॉ. सुबाल दीक्षित, माजी अध्यक्ष, आयएससीसीएम

कोरोनबाधीत रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी देशातील डाँक्टर दिवस-रात्र वैद्यकीय सेवा करीत आहेत. त्यांचे वैद्यकीय ज्ञान अद्ययावत करण्यासाठी हा वेबिनार उपयुक्त ठरला. त्यातून रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.
- डॉ. कपिल बोरावके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com