तीन कोटी पाच लाखांची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

पुणे - सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीच्या संचालकाने कंपनीच्या कागदपत्रांचा गैरवापर करून संबंधित कंपनीच्याच नावाने दुसरी कंपनी स्थापन केली. तसेच, पूर्वीच्या कंपनीची ऑनलाइन पद्धतीने तीन कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी रजनीश कुमार (वय 42, रा. सहरसा, बिहार) यांनी फिर्याद दाखल केली. त्यांची अमेरिकेमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी आहे. यामधील एक संचालक समभागधारक आहेत. कुमार व संबंधित संचालकाने 2015 मध्ये भारतामध्ये व्हेरिफिशंट टेक्‍नॉलॉजी इंक नावाची कंपनी सुरू केली. दरम्यान, संबंधित संचालकाने याच कंपनीची कागदपत्रे, लोगो, वेबसाइट, ई-मेल, भाडेकरारनामा यांचा गैरवापर करून दुसरी कंपनी स्थापन केली. तसेच, पूर्वीच्या कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार नव्या कंपनीत हस्तांतरित केले. त्यानंतर कंपनीची तीन कोटी पाच लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. 

Web Title: Three crore five lakh online frauds