वरवंड येथील तिघांचा कोरोना संसर्गाने मृत्यू

नागरिकांच्या निष्काळजीपणाच्या भूमिकेमुळे स्थानिक प्रशासन हतबल
Covid19 death
Covid19 deathSakal Media
Updated on

वरवंड : वरवंड (ता. दौंड) येथे कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णांमुळे परिस्थिती गंभीर होत आहे. बुधवारी (ता. १४) रात्री दोन महिला व एक पुरुष अशा तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनही हादरले असून, आपत्कालीन समितीने आता ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. दौंड तालुक्यात कोरोना संसर्गाने अक्षऱश: कहर केला आहे. वरवंड, पाटस आदी गावांमध्ये कोरोनाने आपले बस्तान बसविले आहे. वरवंड येथे मागील चौदा दिवसांत तब्बल १२५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण संख्येचा वाढता आलेख लक्षात घेवून पंधरा दिवसांपूर्वी वरवंड येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.

Covid19 death
पुणेकरांच्या २२ प्रश्नांची उत्तरं; काय सुरू काय बंद?

दरम्यान, यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमधील लोकांसाठी रॅपिड अॅंटिजन तपासणी सुविधा सुरु करण्यात आली. वरवंड, पाटससह कोरोना संसर्गाची लक्षणे असणाऱ्या रोज शेकडो लोकांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. मात्र, यामध्ये इतर गावांच्या तुलनेत वरवंड परीसरातील रुग्णांची संख्या जास्त दिसून येत आहे. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे आता ग्रामपंचायत प्रशासनही हतबल झाले आहे.

Covid19 death
पुण्यात आता हॉस्पिटलमध्येही 'रेमडेसिव्हर'चा खडखडाट

राज्य सरकारने लाॅकडाउन करुन देखील कोणताच फरक पडत नसल्याची खंत अनेक जण व्यक्त करीत आहेत. दरम्यान, कोरोना बाबत आपत्कालीन समिती सदस्यांनी वारंवार बैठक घेवून ग्रामस्थांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, काही आडील लोकांमुळे गावाला भोगायचे आले आहे. वारंवार सांगून देखील काहीजण विनामास्क फिरत आहेत. दरम्यान, येत्या दहा दिवसांत गावातील पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी गावातील दोन महिला व एका पुरुषाचा काही तासांच्या फरकाने उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका रात्रीत तीन जण कोरोनाच्या भक्ष्यस्थानी पडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वरवंड पॅटर्न राबविण्याचा प्रयत्न-कोरोनाचा वाढता रुद्रावतार व मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेता. गुरुवारी ग्रामपंचाय कार्यालयात आत्पकालीन समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी कोरोना आटोक्यात आण्यासाठी काही ठोस निर्णय घेण्यात आले. गर्दी टाळण्यासाठी गावात काही दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपसरपंच प्रदिप दिवेकर, पोलिस पाटील किशोर दिवेकर, तानाजी दिवेकर, मनोज सातपुते, दिपक दिवेकर, दशरथ दिवेकर, संजय दिवेकर, राहुल दिवेकर, किशोर दिवेकर, गोरख दिवेकर आदी सदस्य उपस्थित होते.

Covid19 death
वाहनांचा वेग पादचाऱ्यांच्या जिवावर! पाच वर्षांत साडेचारशे ठार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com