पानिपत मोहिमेत पवन मावळातील तीन पिढ्या ; कोरोनाच्या वाढत्यासंख्येमुळे ५० जणांचा सहभाग

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नांना साथ देत जिल्ह्यातील बारा मावळांनी या राष्ट्र उभारणीच्या नाव कार्यात पूर्णपणे झोकून दिले.
 पवन मावळातील तीन पिढ्या
पवन मावळातील तीन पिढ्याsakal

खडकवासला : पानिपताच्या युद्धाला २६१ वर्षे पूर्ण झाली म्हणून सशक्त भारत अभियान अंतर्गत आपल्या कर्तृत्वशाली पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी मावळातील पवना धरणाच्या काठावर वसलेल्या गेव्हंडे खडकमधील खैरे परिवारातील तिन्ही पिढ्या पानिपताच्या (Panipat) रणभूमीवर अभिवादन करायला उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नांना साथ देत जिल्ह्यातील बारा मावळांनी या राष्ट्र उभारणीच्या नाव कार्यात पूर्णपणे झोकून दिले.

 पवन मावळातील तीन पिढ्या
बार्शी : पत्नीस जीवे ठार मारल्याप्रकरणी पतीस जन्मठेप!

अशीच अनुभूती या खैरे परिवारातील तिघीजणी सहभागी होत असताना होत आहे. मावळातील गेव्हंडे खडकमधील ५८ वयाच्या रंजना लक्ष्मण खैरे, त्यांच्या ३० वर्षाच्या सूनबाई, नीलिमा विजय खैरे (रावडे- मुळशीच्या माहेरवाशिण) व आठ व चार वर्षाच्या नाती कु.कामाख्या आणि कु. शिवाज्ञा सहभागी होणार आहेत. अशी माहिती मोहिमेच्या संयोजनातील सुधीर इंगवले यांनी सांगीतले.पानिपतावर जाणारी ही प्रतिकात्मक मोहीम ८ जानेवारीला दुपारी साडेचार वाजता पुण्यातील कसबा गणपतीचे दर्शन घेऊन, लाल महालात जिजाऊंच्या मूर्तीस अभिवादन करुन शनिवारवाड्यापासून निघेल.

 पवन मावळातील तीन पिढ्या
आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यातच करा!

१४ जानेवारीला मकरसंक्रांतीच्या दिवशी पानिपताच्या शौर्यभूमीवर अभिवादन करुन परतीच्या मार्गात निर्धारित सभा, जागरण मेळावे घेऊन पुन्हा २० जानेवारीस पुण्यास परतून लाल महालामध्ये संपेल. देशाच्या सीमा रक्षणाची आणि कारभाराची आपल्या पूर्वजांनी जपलेली परंपरा आपणच जपली पाहिजे आणि त्याचा विचार सर्वसामान्य मराठी मनांमध्ये रुजला पाहिजे, या भावनेने सक्षम आत्मनिर्भरतेचा संदेश देत या माय-लेकी आपल्या आजीसह पानिपताच्या शौर्यभूमीवर चालल्या आहेत. कोरोनामुले सहभागी होता नाही त्या कार्यकर्त्यांनी सशक्त अभियानाच्या सोशल मिडियावर आभासी पद्धतीने सहभागी व्हावे.(Pune news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com