माळवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

पराग जगताप
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

बिबट्याने गोठ्याला लावलेल्या लोखंडी जाळीच्या खाली उकरुन आत प्रवेश करुन दोन बोकड जागीच ठार मारले तर एक गाभण शेळी उचलुन गोठ्याबाहेर नेऊन अर्धवट खावुन सोडुन दिली आहे.

ओतूर (ता. जुन्नर) - माळवाडी ता. जुन्नर येथे आज शुक्रवारी पहाटे बिबट्याने गोठ्यावर हल्ला करुन तीन शेळ्या ठार मारल्या आहे.

रमाकांत बटवाल यांच्या घराच्या बाजुलाच बंदिस्त लोखंडी जाळीच्या गोठ्यावर बिबट्याने गोठ्याला लावलेल्या लोखंडी जाळीच्या खाली उकरुन आत प्रवेश करुन दोन बोकड जागीच ठार मारले तर एक गाभण शेळी उचलुन गोठ्याबाहेर नेऊन अर्धवट खावुन सोडुन दिली आहे. रमाकांत बटवाल यांच्या गोठ्यात दहा बारा शेळ्या व जरशी दोन गाई आहेत.

याबाबत नारायणगाव वनपरिमंडळच्या वनपाल मनिषा काळे म्हणाल्या की, घडना समजताच वनरक्षक कांचन ढोमसे यानी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन पंचणामा केला आहे. सदर व्यक्तीस शासकीय नियमानुसार आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यईल. तसेच नागरिकांनी सतर्क राहवे बिबट्याचे वास्तव्य अढळल्यास वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

सदर घटनास्थळी नेतवड माळवाडी गावचे माजी उपसरपंच शांताराम बटवाल, सदस्य मनोहर बनकर, नवनियुक्त पोलिस पाटील विलास बटवाल यांनी भेट देवुन वनविभागाने त्वरीत या परिसरात पाहाणी करुन बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Three Goats killed in leopard attack in malvadi junnar