पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात 3 जखमी, 2 ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

आश्वी - नाशिक महामार्गावर आनंदवाडी येथे रात्री आंब्याची वाहतुक करणारा ट्रक उलटला. रात्रीच्या अंधारात अपघातग्रस्त वाहनाचा अंदाज न आल्याने, या ठिकाणी दुचाकीसह चार ते पाच विविध वाहने एकमेकांवर  आदळल्याने झालेल्या विचित्र अपघातात तीन जण गंभीर जखमी तर दोन ठार झाले.

महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज सकाळपासून आनंदवाडी शिवारात रास्तारोको केला आहे. यामुळे घारगाव व संगमनेरच्या दिशेला दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने या महत्वाच्या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. 

Web Title: Three injured in road accident on Pune-Nashik highway, 2 killed