Leopard cubs
sakal
ओतूर - धोलवड, ता. जुन्नर येथे ऊसाच्या शेतात बिबट्याचे तीन बछडे आढळून आल्याची घटना सोमवारी (ता. १६) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. धोलवड येथील शिवनेरी विद्यालयाजवळील नितीन कसार यांच्या शेतात ऊसतोडणी दरम्यान ही पिल्ले दिसून आली.
ऊस तोडणी आधी ऊस तोड कामगार ऊस पेटवतात या आगीत ही बिबट्याची बछडी थोडी भाजली असून त्यांची अंगावरील काही केसे जळाली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली.