पंढरपुरातून येणाऱ्या मानाच्या तीन दिंड्यांना आळंदीत प्रवेश मिळणार; पण...

विलास काटे
Saturday, 21 November 2020

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत कार्तिकी वारी कार्तिकी वद्य अष्टमी (८ डिसेंबर) पासून भरणार आहे. आषाढी वद्य एकादशी  (११ डिसेंबर) ला तर संजिवन समाधी सोहळा दिन कार्तिक वद्य त्रयोदशी(ता. १३ डिसेंबर) ला आहे. ८ डिसेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत यात्रा असून वारकऱ्यांचा मुक्काम आळंदीत राहणार आहे.

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीतील कार्तिकी वारीकरीता पंढरपूरातून येणाऱ्या मानाच्या तीन दिंड्यांना आळंदीत प्रवेशासाठी राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली. तीनही दिंड्यासोबत प्रत्येकी वीस वारकऱ्यांना परवानगी असून दिंड्या एसटीने आळंदीत ८ डिसेंबरला पोचणार आहेत. 

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत कार्तिकी वारी कार्तिकी वद्य अष्टमी (८ डिसेंबर) पासून भरणार आहे. आषाढी वद्य एकादशी  (११ डिसेंबर) ला तर संजिवन समाधी सोहळा दिन कार्तिक वद्य त्रयोदशी(ता. १३ डिसेंबर) ला आहे. ८ डिसेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत यात्रा असून वारकऱ्यांचा मुक्काम आळंदीत राहणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रत्येक वर्षी पंढरपूरातून आळंदीतील कार्तिकी वारीसाठी श्री पांडरुंग, संत नामदेवराय, संत पुंडलिकराय या तीन दिंड्या पायी येतात. कार्तिकी वद्य अष्टमीला आळंदीत तीनही दिंड्या पोचतात. यंदा कोरोनामुळे आळंदीतील वारीबाबत अद्याप शासनाने कोणताही निर्णय जाहिर केला नाही. मात्र, आळंदीतील कार्तिकीसाठी या तीनही दिंड्यांचे महत्व आहे. यामुळे राज्य शासनाने पायी वारीऐवजी तीनही दिंड्यांसोबत प्रत्येकी विस लोकांना आळंदीत येण्यासाठी परवानगी दिली असून स्वतंत्र एसटीची सोय केली आहे. तीनही दिंड्या आठ डिसेंबरला पंढरपूरातून आळंदीत येतील आणि प्रतिपदेपर्यंत आठवडाभर आळंदीत राहण्यासाठी परवानगी आहे. सोशल डिस्टन्स पाळून वारी होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरातील कार्तिकी वारी रद्द झाली. यामुळे तीन आठवड्यावर येवून ठेपलेल्या  ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर या आळंदीत होणाऱ्या कार्तिकी वारीबाबत आणखी किती दिंड्या तसेच वारकऱ्यांना राज्य शासन प्रवेश देणार याबाबत उत्सुकता आहे. मात्र, राज्य शासनाने पंढरपूरात परवानगी नाकारल्यानंतर आळंदीतही मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत वारी होण्याचे संकेत आहेत. आषाढी एकादशीला माऊलींची पालखी मंदिरातून नगरप्रदक्षिणेला निघते तर द्वादशीच्या दिवशी माऊलींचा रथ नगर प्रदक्षिणेसाठी निघतो. याला परवानगी देण्याची मागणी वारकऱ्यांमधून होतून आहे. याबाबत अद्याप अद्यादेश राज्य शासनाने काढला नाही तरी वारकऱ्यांनी आता आषाढी प्रमाणेच यंदाची कार्तिकी वारीही खंडित होणार अशी मनाची तयारी केली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''आळंदीतील वारीसाठी राज्यरातून पंधरा दिवस दिंड्या पायी निघतात. यासाठी सरकारने दिंड्या आपापल्या गावातून पायी निघाल्यानंतर मध्यावर येवून ठेपल्यावर निर्णय देण्यापेक्षा लवकर जाहीर करावा. अगोदर निर्णय जाहिर केला तर, वारकऱ्यांना निम्म्यातून माघारी जावे लागणार नाही. कोरोनाबाबत आषाढीला वारकऱ्यांनी दक्षता घेतली ती यावेळीही घेतील''असे आम्ही वारकरीचे रामभाऊ चोपदार यांनी सांगितले.

पुण्यात सायकलट्रॅकचा वापर नगण्यच; 82 टक्के सायकलस्वारांची पाठ  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Main dindi are coming from Pandharpur will get access to Alandi