

पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वारंवार गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. आता तर एक अनोखी घटना समोर आली आहे. दरोडा टाकण्यासाठी चक्क खोटी बंदूक दाखवण्यात आली आहे. मात्र या खोट्या बंदुकीच्या धाकावर दुकानात दरोडा टाकण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.