
पुणे - पुणे जिल्ह्यातील दिव्यांगांना कोरोनामुळे आगामी तीन महिन्यांचा निर्वाह भत्ता आगाऊ (अॅडव्हाॅन्समध्ये) देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. यानुसार येत्या जून अखेरपर्यंतचा हा निर्वाह भत्ता वितरित करण्यात आला आहे. या निर्णयाचा पुणे जिल्ह्यातील पाच हजार ५७ दिव्यांगांना फायदा झाला असल्याचे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सारिका पानसरे यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने दरमहा प्रत्येकी एक हजार रुपये निर्वाह भत्ता देण्यात येतो. या निर्वाह भत्त्यातून दिव्यांगांना औषधोपचार घेता याव्यात, या उद्देशाने दोन वर्षांपूर्वी ही योजना सुरू केली आहे. यानुसार किमान ६० टक्के व्यंग असलेल्या दिव्यांगांची या निर्वाह भत्त्यासाठी निवड करण्यात येते. प्रचलित पद्धतीनुसार दरमहा हा निर्वाह भत्ता देण्यात येत असे. मात्र सध्या कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांच्या घाईत दिव्यांग हे निर्वाह भत्त्यापासून वंचित राहू नयेत, या उद्देशाने हा तीन महिन्यांचा भत्ता आगाऊ वितरित करण्यात आल्याचेही पानसरे यांनी स्पष्ट केले. पुणे जिल्ह्यात या योजनेचे ५ हजार ५७ लाभार्थी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.