esakal | Corona Virus : पुण्यात आढळले कोरोनाचे 3 नवीन रुग्ण: 2 रुग्ण गंभीर 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Virus : पुण्यात आढळले कोरोनाचे 3 नवीन रुग्ण: 2 रुग्ण गंभीर 

Fight With Coronavirus :पुणे : कोरोनाचा संसर्ग झालेल्या दोन रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावरखासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, शहरात गेल्या पंधरा दिवसांमध्ये कोरोनाचे 19 रुग्ण आढळले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे

Corona Virus : पुण्यात आढळले कोरोनाचे 3 नवीन रुग्ण: 2 रुग्ण गंभीर 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

Fight With Coronavirus :पुणे : कोरोनाचा संसर्ग झालेल्या दोन रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावरखासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, शहरात गेल्या पंधरा दिवसांमध्ये कोरोनाचे 19 रुग्ण आढळले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे
41 वर्षांची महिला आणि एक तरुण यांना न्यूमोनिया झाला होता. वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या करूनही त्याचे अचूक रोगनिदान होत नव्हते. त्यामुळे या दोन्ही रुग्णांचे घशातील द्रव पदार्थाचे नमुने तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले. त्या वेळी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. यातील 41 वर्षी महिलेला करोनाचा संसर्ग झाल्याचे शुक्रवारी (ता. 20) झाले होते.  त्यापाठोपाठ आता दुसरा रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. त्या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सोमवारी (ता. 23) निदान झाले. 

Coronavirus : कोरोना व्हायरसची लक्षणे दिसताहेत? घाबरू नका पण...

तीन नवीन रुग्ण
शहारात गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाचे तीन नवीन रुग्ण आढळले असून, या रुग्णांची संख्या आता 19 झाली आहे. महापालिकेच्या नायडू रुग्णालयात आतापर्यंत 560 जणांना दाखल करण्यात आले. या सर्वांचे नमुने तपासण्यासाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले. दाखल केलेल्या 560 पैकी 496 जणांना कोरोनाचा संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यापैकी 19 रुग्णांना संसर्ग झाला आहे. उर्वरित 45 नमुन्यांचा प्रयोगशाळा अहवाल अद्यपा प्रतीक्षेत असल्याची माहिती महा पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. 

Coronavirus : कोरोना व्हायरसची लक्षणे दिसताहेत? घाबरू नका पण...

दाखल रुग्ण 560
तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविलेले नमुने 560
निगेटिव्ह 496
पॉझिटिव्ह 19
प्रलिंबित 45
अत्यवस्थ रुग्ण 2

loading image
go to top