राजगड किल्ल्यावर तीन जणांना मधमाशांचा चावा; महिला जखमी

दीडशे फूट दरीत पडल्याने महिला गंभीर जखमी
Three people were bitten by bees at Rajgad fort Woman injured pune
Three people were bitten by bees at Rajgad fort Woman injured pune sakal

वेल्हे : किल्ले राजगड (ता.वेल्हे) येथे आलेल्या एकाच कुटुंबातील तीन पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतला असून तीनही पर्यटक जखमी झाले आहेत. यातील महिला मधमाशा पासून बचाव करताना खोल दरीत दीडशे फूट पडल्याने गंभीर जखमी झाली आहे . आज शनिवार २३ रोजी सकाळी दहाच्या दरम्यान ही घटना घडली. रोहिणी सागर वराट (वय ,२८), सागर दिनेश वराट, राहणार भुमकर चौक, अक्षय मधुकर पवार ,पुणे असे असे जखमी पर्यटकांची नावे असून या तीनही जणांवर नसरापुर (ता. भोर) येथील खाजगी रुग्णालयात यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की आज सकाळी एकाच कुटुंबातील चार जण राजगड किल्ला पहावयास आले असताना सकाळी साडेनऊच्या सुमारास किल्ला पाहून झाल्यानंतर गुंजवणे दरवाजा जवळ ही घटना घडली. सुवेळा माची कडे असणाऱ्या आगी मोहाच्या माशा उठल्याने किल्ल्यावरील आलेल्या पर्यटकांना चावा घेतला असल्याची माहिती राजगड किल्ल्याचे किल्लेदार बापू साबळे यांनी दिली. मधमाशा चावत असल्याने रोहिणी चराट या मधमाशांचं पासून बचाव करताना पळत असताना खोल दरीत दीडशे ते दोनशे फूट खाली पडल्या यावेळी येथील उपस्थित किल्लेदार बापू साबळे तसेच त्यांचे सहकारी आकाश कचरे, विशाल पिलावरे, दीपक पिलावरे व इतर दोन पर्यटकांनी या महिलेस दरीतून वर काढले महिला बेशुद्ध असल्याची माहिती वेल्हे पोलिसांना देताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले दरम्यान येथील किल्ल्याचे कर्मचारी व वेल्हे पोलिस नाईक ज्ञानेश्वर धिवार, पोलीस हवलदार औदुंबर अडवाल, पोलीस कॉन्स्टेबल वैजनाथ घुमरे, ज्ञानेश्वर शेडगे आदी कर्मचाऱ्यांनी महिलेस झोळी करून किल्ल्याच्या खाली आणण्यात आले.

यावेळी किल्ल्यावरून खाली आणल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच नसरापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नसरापूर येथील सुर्यवंशी हाॅस्पिटल मध्ये सदर महिलेवर उपचार चालु असुन डॉ विराज सुर्यवंशी यांनी माहिती देताना सांगितले कि, महिला उंचावरून पडल्याने तीच्या ओटी पोटात लाकुड घुसल्याने ती गंभीर जखमी झाली आहे अद्याप ती बेशुद्ध असुन तीच्यावर उपचार चालु आहे मात्र धोका टळलेला नाही.

किल्ले राजगड व तोरणा गडावर हजारो पर्यटक येत असतात यामध्ये अनेकदा अनेक अपघाताच्या विविध घटना घडत आहेत .खोल दरीत पडणे, सर्पदंश होणे, हृदयविकाराचा झटका आल्याने दरीत कोसळने अशा घटना घडत असताना किल्ल्यावरील कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांना जखमी झालेल्या पर्यटकांना खोल दरीतून वर काढताना व किल्ल्यावरून खाली आणण्यासाठी या ठिकाणी आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्याने जीव धोक्यात घालून खोल दरीत उतरणे किल्ल्यावरील जखमी पर्यटकांना किल्ल्याच्या खाली आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावा लागत आहे यामध्ये योग्य ते साहित्य उपलब्ध नसल्याने किल्ल्यावरून खाली येण्यासाठी उशीर झाल्यास जखमी पर्यटकाचा मृत्यू होण्याची संभावना जास्त असल्याने वेल्हे तालुक्यातील दोन किल्ल्यांवरती रेस्क्यू टीमचे साहित्य मिळावे अशी मागणी गडप्रेमी कडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com