पुणे : अल्पवयीन मुलांचे व्हिडीओ शेअर करणारे तिघे अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

अल्पवयीन मुलांचे व्हिडीओ शेअर करणाऱ्या तिघांना पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या सायबर सेलने अटक केली. 

पिंपरी : अल्पवयीन मुलांचे व्हिडीओ शेअर करणाऱ्या तिघांना पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या सायबर सेलने अटक केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सांगवी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात केवा परबाराम देवासी (वय 22, रा. राधाकृष्ण उद्यानाशेजारी, पिंपळे गुरव) याला अटक केली आहे. तर चाकण ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यात किशोर भानुदास वाघमारे (वय 24, रा. दावडा मळा, चाकण) व अजय माताप्रसाद सागर (वय 25, रा. निघोजे, चाकण) यांना सायबर सेलने जेरबंद केले आहे. 

पुण्यात मानसी नाईकचा विनयभंग

यासह गुरुवारी (ता. 6) वाकड पोलिस ठाण्यात महेश सहानी याच्यावर गुन्हा दाखल असून चिखली ठाण्यात बालाराम दास याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हे दोन्ही आरोपी फरारी आहेत. या आरोपींनी त्यांच्या मोबाईलवरून अल्पवयीन मुलांचे अश्‍लील व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल केले. पोलिस अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three person arrested for sharing videos of minors in Pune Pimpri