esakal | पुण्यातील तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तिघांना जन्मठेप
sakal

बोलून बातमी शोधा

high court

सामूहिक बलात्कार करणाऱ्या तिघांना उच्च न्यायालयाचा दणका

sakal_logo
By
टीम इसकाळ

पुणे : हिंजवडी येथील एका एमबीए पदवीधर मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या तिघा नराधमांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला. आरोपींना दोषी ठरवत पुणे सत्र न्यायालयाने २०११ साली सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने कायम ठेवली. एवढेच नव्हे तर या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पीडितेच्या सन्मानाचे रक्षण करण्यात अपयशी ठरले अशी टिप्पणीही खंडपीठाने केली.

हेही वाचा: गाडी नको पण चिरीमिरी आवर...

१ एप्रिल २०१० रोजी पुण्यातील आयटी पार्क, मानकर चौक, वाकड येथे पीडित तरुणीने घरी जाण्यासाठी गाडीत लिफ्ट मागितली त्यावेळी आरोपी सुभाष भोसले, गणेश कांबळे आणि रणजित काळे या तिघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने तिघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात आरोपींकडून अपील करण्यात आले.

दरम्यान पीडित साक्षीदाराची उलट तपासणी घेताना बचाव पक्षाच्या वकिलांनी तिला अनावश्यक प्रश्न विचारले तिने संमतीने संबंध प्रस्थापित केले तसेच तिने मद्य प्राशन केले होते हे सुचवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यावेळेस सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आरोपींच्या वकिलांना असे प्रश्न विचारण्यापासून रोखले नाही. किंवा अशा प्रकारच्या उलट तपासणीला आक्षेपही घेतला नाही.त्यामुळे सत्र न्यायालयाच्या निरीक्षणावर नाराजी व्यक्त करत तिघांना सुनावलेली जन्म ठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली

हेही वाचा: पुणे : लशी आहेत पण सुया नाहीत; आज लसीकरण बंद

loading image
go to top