esakal | गिर्‍हाईकांची गर्दी दुकानदारांच्या आली आंगलट
sakal

बोलून बातमी शोधा

Three shopkeepers were booked not maintaining social distancing

कर्फ्यु लागु होण्यापुर्वी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी रविवार( ता. ६) सायंकाळी चारच्या दरम्यान नागरिकांनी कोऱ्हाळे बुद्रुक येथे किराणा दुकानात खरेदीसाठी लोकांची एकच झुंबड उडाली, परिणामी काही ग्रामस्थांनी सोशल डिस्टन्स पाळला जात नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले.

गिर्‍हाईकांची गर्दी दुकानदारांच्या आली आंगलट

sakal_logo
By
चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर : दुकान जवळ झालेली गिर्‍हाईकांची गर्दी दुकानदारांच्या चांगलीच आंगलट आली सोशल डिस्टन्स पाळला जात नसल्याचा ठपका ठेऊन पोलिसांनी बारामती तालुक्‍यातल्या कोऱ्हाळे बुद्रुक येथील तीन दुकानदारांवर गुन्हा नोंदवला आहे.
 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोमवार (ता. ७) पासून बारामती तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहेनागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.  कर्फ्यु लागु होण्यापुर्वी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी रविवार( ता. ६) सायंकाळी चारच्या दरम्यान नागरिकांनी कोऱ्हाळे बुद्रुक येथे किराणा दुकानात खरेदीसाठी लोकांची एकच झुंबड उडाली, परिणामी काही ग्रामस्थांनी सोशल डिस्टन्स पाळला जात नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले.

बाउन्सरचा 'डोस'; रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये दहशत

पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता. तीन किराणामालाच्या दुकानात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले सोशल डिस्टन्स न पाळल्यामुळे अभिजीत प्रकाशलाल दोशी, पंकज विजयकुमार दोशी, शितल शांतीलाल  दोशी या दुकानदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात रुग्ण फिरला तीन तास अन् उपचार पिंपरीत