कोरोनाचा मृत्यूदर कसा कमी होणार? वाचा उपचाराची त्रिसूत्री

coronavirus three steps program for control death toll
coronavirus three steps program for control death toll

पुणे Coronavirus : अचूक निदान, तत्काळ वर्गवारी आणि योग्य वेळी योग्य उपचार या त्रिसूत्रीने कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण निश्चित कमी करता येईल, असा सल्ला इंडियन सोसायटी आँफ क्रिटीकल केअर मेडिसीनचे (आयएससीसीएम) माजी राष्ट्रीय अध्यक्ष डाँ. सुबाल दीक्षित यांनी दिला.

कोरोना विषाणूंच्या संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी वर्गवारी तयार करण्यात आली आहे. लक्षणे नसणारे रुग्ण, सौम्य लक्षणांचे रुग्ण, मध्यम आणि अत्यवस्थ अशा प्रकारच्या वर्गवारीच्या आधारावर उपचार करण्यात येत आहे. कोणत्या टप्प्यावर कोणते उपचार आणि त्यासाठी कोणत्या वैद्यकीय चाचण्या करणे आवश्यक आहे, हे निश्चित केले आहे. त्यामुळे निदान झालेल्यानंतर त्याची प्रकृतीतील प्रत्येक वैद्यकीय निकषांवर बारकाइने लक्ष ठेवण्याचे आव्हान सध्या डाँक्टरांपुढे आहे. दाखल झालेल्या रुग्णाची प्रकृती बिघडणार नाही, तो त्यातून बरा होईल, यासाठी कोणत्या टप्प्यावर कोणत्या औषधांचा वापर करावा, याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. 
कोरोनाचे निदान झालेले आणि प्रकृती स्थिर असलेले रुग्णांना विलगिकरण कक्षात दाखल करून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करावे. त्यासाठी रुग्णांनी लक्षणे दिसताच तातडीने रुग्णालयात दाखल झाले पाहिजे, असा सल्ला डाँ. दीक्षित यांनी दिला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सौम्य लक्षणे
ए) लक्षणे नसलेले रुग्ण
निकष :  कोरोनाचा संसर्ग झालेला पण कोणतेही ठळक लक्षणे नसलेले रुग्ण. 
उपाय : इतरांचा संसर्ग टाळण्यासाठी विलगिकरण कक्षात दाखल केले जाते.
उपचार : हाडड्राँक्सीक्लोरोक्विन
तापसण्या : हिमोग्लोबिन, रक्तातील साखरेचे प्रमाण, मूत्रपिंड, यकृत यांचे कार्यक्षमता, ईसीजी अशा समान्या तपासण्या.
बी) लक्षणे दिसणारे रुग्ण
निकष : ताप, सर्दी, खोकला, अंग दुखी, त्रास घ्यायला थोडा त्रास होणे ही
उपाय : विलगिकरण कक्षात दाखल करून घेणे
उपचार : बेसिक अँटिबायोटिक्स आणि हायड्राँक्सीडक्लोरिक्लिन
तपासण्या : इतर समान्य तपासण्यांबरोबरच न्यूमोनियानिदासाठी एक्स-रे, रक्तातील प्राणवायूचे प्रमाण 
सी) जोखमीचे रुग्ण
निकष : ताप, सर्दी, खोकला, अंग दुखीबरोबरच बरोबर स्थुलता, 60 पेक्षा जास्त वय, मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड विकार, रोग प्रतिकारशक्ती कमी
उपाय : विलगिकरण कक्षात निरीक्षणाखाली दाखल करून घेणे
उपचार : बेसिक अँटिबायोटिक्स आणि हायड्राँक्सीक्लोरिक्लिन
तपासण्या : ए आणि बी वर्गातील चाचण्यांबरोबरच करोनासाठी काही विशेष चाचण्या होतात. रक्तातील आँक्सिजनचे प्रमाणावर सातत्याने लक्ष ठेवणे.   

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मध्य लक्षणे
डी) सौम्य न्यूमोनिया असून प्रकृती स्थिर असलेले रुग्ण
निकष : ठकळ लक्षणे आणि न्यूमोनियासह इतर आजार
उपाय : उपचारांसाठी आयसीयूमध्ये दाखल
उपचार : हायड्राँक्सीक्लोरोक्वीन, अँटीबायोटिकबरोबरच स्टिराँइडचा विचार
तपासण्या : अ,ब,क वर्गाच्या चाचण्यांबरोबर एक्स-रेतून न्यूमोनियाचे निदान असते, 
इ) गंभीर न्यूमोनिया आणि वाढलेली गुंतागुंत
निकष : न्यूमोनिया, दम लागतो, वेगवेगळ्या अवयवांवर झालेला दुष्परिणाम
उपाय : अतिदक्षता विभागा सूक्ष्म निरीक्षणाखाली ठेवले जाते, व्हेंटिलेटर, फिजिओथेरपी, प्रोन व्हेंटीलेशन
उपचार : हायड्राँक्सीक्लोरोक्वीन, उच्च  प्रतीची अँटीबायोटिक्स, रक्त पातळ करण्याचे औषध
तपासण्या : सामान्य चाचण्यांबरोबरच रक्तातील प्राणवायूबरोबरच, इतर घटकांच्या चाचण्या, हृदयाची कार्यक्षमता, मूत्रपिंडाची गुंतागुंत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एफ) अत्यवस्थ
निकष : न्यूमोनिया, श्वसन संस्थेचा मंदावलेले कार्य, वेगवेगळ्या अवयवांचे थांबलेले कार्य 
उपाय : अतिदक्षता विभागात प्रगत व्हेंटीलेटर 
उपचार : उच्च प्रतीची अँटीबायोटिक्स, हायड्राक्सीक्लोरोक्वीन, स्ट्रिराँइडस् अशी काही औषधे वापरतात. या वर्गात निश्चित औषधे नाही.
तपासण्या : नियमित चाचण्या, अवयवांची कार्यक्षमता तपासण्याच्या चाचण्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हृदय, मूत्रपिंड, यकृत यांना रक्तपुरवठा करणाऱया अत्यंत सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये कोरोना विषाणू अडथळे निर्माण करतात. त्यातून या अवयवांना होणारा रक्तपुरवठा खंडीत होतो. त्यातून रुग्णाच्या एकेका अवयवांचे कार्य मंदावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर सुरवातीपासूनच प्रभावी उपचार सुरू करणे आवश्यक आहे,
- डाँ. सुबाल दीक्षित, माजी अध्यक्ष, आयएससीसीएम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com