पुण्यात वृद्ध महिलेच्या अंगावरुन रिक्षा घालत रिक्षाचालकाने लुटले 25 हजार रुपये

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

फिर्यादी महिला या सेवानिवृत्त आहेत. त्यांचे पौड रस्त्यावरील आनंदनगर येथील स्टेट बँकेमध्ये निवृत्ती वेतनाचे खाते आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी दुपारी त्या बँकेमध्ये पेन्शनची रक्कम काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी अडीच वाजता बँकेतून 25 हजार रुपयांची रक्कम काढली. त्यानंतर त्या बँकेच्या खातेपुस्तिकेमध्ये रक्कम ठेवून त्या घरी निघाल्या. रस्ता ओलांडून त्यांनी एका रिक्षाचालकास थांबविले. त्यास पत्ता सांगून घरी नेण्यास सांगितले. 

पुणे : बँकेमधील पेन्शनची रक्कम काढून रिक्षाने घरी जाणाऱ्या वृद्ध महिलेकडील 25 हजार रुपयांची रक्कम रिक्षाचालकाने लुटली. केवळ थेवढ्यावरच न थांबता रिक्षाचालकाने निर्दयीपणे महिलेच्या अंगावरुन रिक्षा घालत तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना सोमवारी दुपारी पावणे तीन वाजता कोथरुडमधील अंजठा ऍव्हेन्यु सोसायटीसमोर घडली. दरम्यान, या प्रकारामुळे पुन्हा एकदा वृद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

आजपासून तुझी उलटी गिनती सुरू कर, तुला अन् तुझ्या मुलाला मारुन टाकीन
 

या घटनेमध्ये 65 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी संबंधीत महिलेने कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला या सेवानिवृत्त आहेत. त्यांचे पौड रस्त्यावरील आनंदनगर येथील स्टेट बँकेमध्ये निवृत्ती वेतनाचे खाते आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी दुपारी त्या बँकेमध्ये पेन्शनची रक्कम काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी अडीच वाजता बँकेतून 25 हजार रुपयांची रक्कम काढली. त्यानंतर त्या बँकेच्या खातेपुस्तिकेमध्ये रक्कम ठेवून त्या घरी निघाल्या. रस्ता ओलांडून त्यांनी एका रिक्षाचालकास थांबविले. त्यास पत्ता सांगून घरी नेण्यास सांगितले. 

पुणे : वडगाव शेरीत भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू 
 

दरम्यान, फिर्यादी यांना पौड रस्त्यावरील गुजरात कॉलनीमधील वृंदावन सोसायटीत जायचे होते. तर रिक्षाचालकाने त्याची रिक्षा पौड रस्त्यावरील कृष्णा हॉस्पिटलच्याजवळ असलेल्या एका छोट्या गल्लीत नेली. गल्ली निर्मनुष्य असल्यामुळे फिर्यादी यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी त्यास तत्काळ रिक्षा थांबविण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पाकीटातून वीस रुपये काढून रिक्षा भाडे देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी खातेपुस्तिकेत ठेवलेली 25 हजारांची रोकड रिक्षाचालकाने पाहिली. त्यानंतर फिर्यादीस काही कळण्यापुर्वीच त्याने त्यांच्या हातातील रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली. या प्रकारामुळे महिलेने आरडाओरडा केला. त्यानंतर त्या त्यानंतर रिक्षाचालकाने त्यांना ढकलून दिले. त्यामुळे त्या खाली पडल्या. त्यावेळी त्याने रिक्षा त्यांच्या हाता-पायावर घालून तो पसार झाला.

भोसरीत जुन्या भांडणावरून एकावर भरदिवसा गोळीबार 

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर रिक्षाचालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. नागरिकांनी महिलेस पौड रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. 

वनप्लस डिस्ट्रीब्यूशनचे काम देतो सांगून तरुणाची तब्बल 23 लाखांची फसवणूक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rickshaw Driver looted 25 thousand rupees by taking riksha over the old woman body in pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: