चिकन कच्चे असल्याचा जाब विचारला म्हणून तिघांना मारहाण

अनिल सावळे
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पर्णीकर व त्यांचे मित्र प्रतिष पिल्ले व सागर कांबळे हे गेल्या 4 तारखेला रात्री साडेअकरा वाजता कान्हे येथील अप्सरा ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. चिकन मसाल्यातील चिकन कच्चे असल्याच्या कारणावरून त्यांचा तेथे वाद झाला.

वडगाव मावळ : चिकन कच्चे असल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून ग्राहकाच्या मोटारीची तोडफोड करुन तिघांना मारहाण केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी रविवारी रात्री कान्हे येथील ढाबा मालकासह दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी अप्सरा ढाब्याचे मालक लवलीसिंग ( पूर्ण नाव माहित नाही ) याच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अभिषेक सुधाकर पर्णीकर ( वय 30 वर्षे, रा. गुलटेकडी, पुणे ) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

- पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पर्णीकर व त्यांचे मित्र प्रतिष पिल्ले व सागर कांबळे हे गेल्या 4 तारखेला रात्री साडेअकरा वाजता कान्हे येथील अप्सरा ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. चिकन मसाल्यातील चिकन कच्चे असल्याच्या कारणावरून त्यांचा तेथे वाद झाला. हे तिघे जण मोटारीतून पुण्याकडे येत असताना दोन गाड्यातून आलेल्या आठ ते दहा जणांनी पाठलाग करुन त्यांची मोटार अडवली. दगडी मारुन समोरील व पाठीमागील काचा फोडल्या. हातातील तलवारीने उलट्या बाजूने व लाकडी दांडक्‍याने तिघांनाही मारहाण केली.

पुणे : कोंढव्यात भरधाव टँकरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
 

मित्र पळून गेल्यानंतर लवलीसिंग याने जबरदस्तीने बोलेरो गाडीत बसवून अप्सरा ढाब्यावर आणले व एका खोलीत कोंडून पुन्हा मारहाण केली. मारहाणीत हातातील दोन अंगठ्या व ब्रेसलेट गहाळ झाले. पोलिसांनी फिर्यादीवरुन रविवारी रात्री गुन्हा दाखल केला.

पिंपरी : ...म्हणून सॉफ्टवेअर इंजिनीअरने केली 5 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The three were beaten up for being asked if the chicken was raw cooked at kanhe Pune District

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: