esakal | कचरा टाका, पैसे कमवा! पुण्यात ४० ठिकाणी बसणार एटीएम
sakal

बोलून बातमी शोधा

Garbage ATM
कचरा टाका, पैसे कमवा! पुण्यात ४० ठिकाणी बसणार एटीएम

कचरा टाका, पैसे कमवा! पुण्यात ४० ठिकाणी बसणार एटीएम

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - नागरिक प्लास्टिक, काचेच्या बाटल्या, धातूचे कॅन्स, प्लॅस्टिक रॅपर कुठेही फेकून देण्यापेक्षा ते महापालिकेने बसविलेल्या स्वच्छ एटीएम मध्ये टाकल्यास त्याबदल्यात नागरिकांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. इकोमक्स गो (इं) या स्टार्टअप कंपनीच्या या योजनेला स्थायी समितीने मान्यता दिली.

'पुनर्वापर होणारा कचरा या एटीएम मशिन्समध्ये संकलित केला जाणार आहे. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर कचऱ्याचा कुठला प्रकार निवडायचा आहे त्याची माहिती द्यावी लागणार आहे. प्लॅस्टिकच्या एका बाटलीसाठी एक रुपया, काचेच्या बाटलीसाठी तीन रुपये, धातुच्या कॅनसाठी प्रत्येकी दोन रुपये आणि प्लॅस्टिक रॅपर्ससाठी प्रत्येकी वीस पैसे जमा होणार आहेत.'

या एटीएम मध्ये २४ तास मोफत वाय-फाय, नवीन बॅंक खाते उघडण्याची सोय, नवीन सिम कार्ड खरेदी, सिनेमा, रेल्वे, बसेसच्या तिकिटांची खरेदी, फी भरणे, पैसे पाठविणे अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.शहरात सार्वजनिक ठिकाणी दहा वर्षे मुदतीसाठी तीन वर्षांच्या कालावधीत चाळीस मशिन्स टप्प्याटप्प्याने बसविण्यात येणार आहेत, असे स्थायी अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

हेही वाचा: "काय भोगलं असेल तिनं..."; पुण्यातील हत्या प्रकरणावर चित्रा वाघ संतापल्या

स्थायी समितीतील इतर प्रमुख निर्णय

- कोरोनात काळात समाजकार्य करणाऱ्या संस्थांना मानपत्र देऊन गौरविण्यात येणार

- महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी कमला नेहरू रुग्णालयात मधुकर बिडकर रक्तपेढीसाठी साहित्य खरेदीस मान्यता

- इकोमॅन कंपनीचा प्रकल्प अयशस्वी ठरल्याने ९.७१ कोटीच्या वसुलीचा दावा दाखल करण्यास मान्यता

- स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर स्मारक येतील जागा विवेक व्यासपीठ आणि सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर स्मारकाची जागा स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानला ३० वर्षासाठी देण्यास मान्यता

loading image
go to top