esakal | पुणेकरांनो सावधान : पुढचे चार दिवस धोक्याचे, हवामान खात्यानं दिलाय इशारा

बोलून बातमी शोधा

thunderstorm in Arabian sea pune city may have heavy rainfall

अरबी समुद्रातील लक्ष्यद्वीप बेटांच्या वर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, पुढील २४ तासांमध्ये त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे.

पुणेकरांनो सावधान : पुढचे चार दिवस धोक्याचे, हवामान खात्यानं दिलाय इशारा
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : लॉकडाउन असतानाही विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांनी दुपारच्या आता घर गाठलं तर बरं... नाहीतर पाऊस त्यांना गाठेल. शहर आणि परिसरात पुढील चार दिवस बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. विशेष करून बुधवारी (ता.३) सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह तीव्र मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा, हवामानशास्र विभागाने दिला आहे. पुढील तीनही दिवस आकाश मुख्यत्वे ढगाळ, तर वातावरणात आद्रता जास्त असेल. 

आणखी वाचा - पुणेकरांनो तुमचं फेसबुक हॅक होऊ शकतं

अरबी समुद्रातील लक्ष्यद्वीप बेटांच्या वर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, पुढील २४ तासांमध्ये त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते उत्तरेकडे म्हणजेच महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीकडे प्रवास करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यात दुपारनंतर आकाश मुख्यत्वे ढगाळ, तर सोसाट्याचा वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. बुधवारी (ता.३०) हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असून त्यादिवशी राज्यात ढगांच्या गडगडाटासह तीव्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असे हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ.अनुपम काश्यापि यांनी सांगितले आहे.

पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहरात पूर्वमौसमी पाऊस दाखल
दिवसभर उकाड्याने त्रस्त असलेल्या पुणेकरांना दुपारनंतर पडलेल्या पूर्वमौसमी पावसाने थंडावा दिला. शहराच्या पश्चिम भागात बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी सुटलेल्या वाऱ्यामुळे शहरातील वातावरणात संध्याकाळी थंडी जाणवत होती. रविवारी  शहरातील कमाल तापमान ३७.५ तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुढील तीन दिवस दुपारपर्यंत उकाडा आणि संध्याकाळी पाऊस असे चित्र पाहायला मिळेल.

आणखी वाचा - शरद पवार यांनी गाठलं कार्यकर्त्याचं घर; वाचा बातमी

सोमवारी मान्सून केरळात
शेतकऱ्यांसह सामान्यांना ओढ लागलेला मान्सून सोमवारी (ता.१) केरळमध्ये दाखल होईल, असे हवामान विभागाने सांगितले आहे. त्याच्या पुढील वाटचालीवर हवामान विभागाचे लक्ष असून आतापर्यंत तरी मान्सूनच्या प्रवासासाठी योग्य हवामान आहे.