

कोटा स्थानकावर
तीन संशयित अटकेत
लोगो - टायगर श्रॉफ हल्लाप्रकरण
जयपूर, ता. १९ : अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणातील तीन संशयितांना राजस्थानच्या कोटा स्थानकावर ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. जयपूरहून दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असे सांगण्यात येते.
मुंबईतील जुहू परिसरामध्ये रविवारी सायंकाळी टायगर श्रॉफवर हल्ला झाला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस आरोपींचा कसून तपास करत आहेत. श्रॉफवर गोळीबार केल्यानंतर तिन्ही आरोपी पुण्याहून जयपूरकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसले. या रेल्वेतून ते जयपूरला जाणार होते आणि तेथून बसने दिल्लीला जाणार होते. दिल्लीतून ते नेपाळमध्ये फरार होण्याच्या तयारीत होते. त्यांच्याविषयीची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी राजस्थान पोलिसांना कळविले होते. त्यानुसार कोटा स्थानकावर स्थानिक पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. गाडी स्थानकावर पोहोचताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे कोणतेही शस्त्र सापडले नाही, अशी माहिती कोटाच्या पोलिस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी दिली. आरोपींपैकी दोघे जण हरियानाचे असून, एक जण बिहारचा आहे. तिन्ही आरोपींपैकी कोणीही अल्पवयीन नाही, अशी माहिती मुंबईतील पोलिस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.