नांदूरच्या कंपनीतून 'टाईल्स' चोरी करणारी टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

यवत - नांदूर (ता. दौंड) येथील टाईल्स कंपनी मधील टाईल्सची चोरी करणारी टोळी यवत पोलिसांनी जेरबंद केली आहे. यासाठी त्यांना स्थानिक पोलिस मित्रांची मोठी मदत झाली आहे. या प्रकरणी कंपनी मालक श्रीकांत खाडिलकर (रा मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. 

यवत पोलिसांनी धीरजकुमार जाट, प्रदीपकुमार दयाल, कुलदीप चाक, पवनकुमार शर्मा, आकाश कुमार राय (सर्व रा. उत्तर प्रदेश) या आरोपींना अटक केली असून दौंड न्यायालने त्यांना दि. 22 पर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले आहेत.

याबाबत यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.15 डिसेंबर रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास नांदूर (ता. दौंड) येथील मिराज सिरिमिक्स प्रा. लि. या टाईल्स कंपनी मधील गोडावून मधून टाईल्स चोरीचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळली. पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे व त्यांच्या पथकावर ही कामगीरी सोपवली. पोलिस उपनिरीक्षक वाघमोडे यांनी स्थानिक पोलिस मित्रांच्या मदतीने या ठिकाणी धाड टाकली. या कारवाईत पोलिस पथकाने एका टेम्पो सह पाच परप्रांतीय आरोपींना अटक केली यात कंपनीच्या सुरक्षा रक्षकाचाही समावेश आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी एका टेम्पोसह (क्र. एम एच 42 ए क्यू 2169) 170 बॉक्स फरशी ताब्यात घेतली आहे. ही कंपनी संध्या बंद असून या पुर्वीही येथून टाईल्स चोरीचे प्रकार धडल्याचे समोर आले आहे. फिर्यादी श्रीकांत खाडिलकर यांच्या म्हणण्यानुसार कंपनीच्या या गोडावूनमधून आजवर 16 लाख रुपयांची टाईल्स चोरीला गेली आहे. या प्रकारात इतर आरोपींचा समावेश असल्याचे पोलिसांचा संशय असून आरोपींचा शोध सुरू आहे. कारवाई करणाऱ्या पथकात पोलिस उप निरीक्षक सोमनाथ वाघमोडे, पोलिस वाहन चालक परशुराम पिलाने, विनोद रासकर यांचा सहभाग होता. पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सोमनाथ वाघमोडे पुढील तपास करीत आहेत.

कंपनीमधील चोरलेल्या टाईल्स स्वस्तात विकत घेण्यामध्ये अनेक स्थानिक नागरीकांचा समावेश असल्याचे बोलले जाते. या पोलिस कारवाईमुळे आपले नावही पुढे येणार या भितीने अऩेकांनी 'सेटींग' लावण्य़ास सुरूवात केली असल्याची सध्या परिसरात जोरदार चर्चा आहे. अनेकांची घरे बांधून झाली आहेत. पोलिस तपासात आपल्या राहत्या घराच्या टाईल्स काढण्याची तर वेळ येणार नाहीना या विचाराने अऩेकजन धास्तावले आहेत.

Web Title: 'Tiles' robber arrested in yavat