स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी काँग्रेस कडून तिरडी आंदोलन

भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या बालगंधर्व रंगमंदिर येथील कार्यक्रमाच्या वेळी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी तिरडी आंदोलन करत महागाईचा व केंद्र सरकारचा निषेध नोंदविला.
स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी काँग्रेस कडून तिरडी आंदोलन

पुणे - भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या बालगंधर्व रंगमंदिर येथील कार्यक्रमाच्या वेळी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी तिरडी आंदोलन करत महागाईचा व केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करून जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांकडून बालगंधर्व रंगमंदिर परिसरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सेनापती बापट रस्ता येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी सोमवारी सकाळी स्मृती इराणी उपस्थित होत्या.दरम्यान या कार्यक्रमाच्या ठिकाणी ही काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईविरोधी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले. यावेळी चतु:शृंगी पोलिसांनी कॉँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले. दरम्यान सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बालगंधर्व रंगमंदिर एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठीही स्मृती इराणी यांना आमंत्रित करण्यात आले होते. सायंकाळी पावणे पाच वाजता झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष पूजा आनंद यांच्या नेतृत्वाखाली शंभर ते दीडशे महिलांनी तिरडी आंदोलन केले. या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, अभय छाजेड, मनीष आनंद, कमल व्यवहारे,संगीता तिवारी वैशाली मराठे,सुजाता शेट्टी, मीरा शिंदे आदींनी सहभाग घेतला होता.

यावेळी महिला कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडर पेट्रोल डिझेल दरवाढ आणि वाढता महागाईविरोधात केंद्र सरकारवर टीका करीत जोरदार घोषणाबाजी केली. महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले आंदोलनानंतर कॉँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ता काँग्रेस भवनाच्या दिशेने निघून गेल्या.

पोलिसांचा कडक बंदोबस्त

आंदोलनाला वेगळे वळण मिळू नये यासाठी, पुणे पोलिसांकडून बालगंधर्व रंगमंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवला होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्यासह परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. याबरोबरच बालगंधर्व रंगमंदिराचे मुख्य प्रवेशद्वारासह दुसऱ्या प्रवेशद्वाराभोवतीहि मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवला होता. समोरील महापालिकेकडून सेनापती बापट रस्त्याला जोडणारा रस्ताही पोलिसांनी बंद केला होता. त्यामुळे वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com