पूनावाला, चौधरी यांना टिमविची डी.लिट. जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

जागतिक आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजाविणारे ‘सिरम’चे अध्यक्ष सायरस पूनावाला, भारतीय उत्पादने आणि सेवा यांच्या गुणवत्तेचा मानदंड जागतिक पातळीवर प्रस्थापित करणारे ‘प्राज’चे प्रमोद चौधरी यांना डी.लिट. दिली जाणार आहे, असे टिळक यांनी सांगितले.

पुणे - टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ‘सिरम’ कंपनीचे संस्थापक- अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला आणि ‘प्राज इंडस्ट्रीज’चे संस्थापक- कार्यकारी अध्यक्ष प्रमोद चौधरी यांना सन्माननीय डी.लिट. (विद्यानिधी) पदवी देऊन गौरविले जाणार आहे. शनिवारी (ता. १५) टिमविचा ३२ वा पदवीप्रदान सोहळा होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यंदा ८८ जणांना पीएच.डी., ११ विद्यार्थ्यांना एम.फिल., १ हजार ८५० विद्यार्थ्यांना पदवी, तर २६४२ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी दिली जाणार आहे. जागतिक आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजाविणारे ‘सिरम’चे अध्यक्ष सायरस पूनावाला, भारतीय उत्पादने आणि सेवा यांच्या गुणवत्तेचा मानदंड जागतिक पातळीवर प्रस्थापित करणारे ‘प्राज’चे प्रमोद चौधरी यांना डी.लिट. दिली जाणार आहे, असे टिळक यांनी सांगितले.

पितृछत्र हरपले; आईची मृत्यूशी झुंज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TMC D.Litt. Announced to poonawala-Pramod Choudhary