esakal | पुणे शहरात आज होणार ६९ केंद्रांवर लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

पुणे शहरात आज होणार ६९ केंद्रांवर लसीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेकडे (Municipal) उपलब्ध असलेल्या लसीचे वितरण (Vaccination Distribution) करण्याचे नियोजन करण्यात आले असून, आज (गुरुवारी) महापालिकेच्या ६९ केंद्रांवर लसीकरण (Vaccination) होणार आहे. महापालिकेला मंगळवारी (ता. २५) कोव्हीशील्डचे १९ हजार तर कोव्हॅक्सीनचे २ हजार ३०० डोस प्राप्त झाले होते. त्यानुसार आज शहरातील ११५ केंद्रांवर लसीकरण झाले आहे. यातून शिल्लक असलेली लस गुरुवारी नागरिकांसाठी उपलब्ध असेल. (Today 69 Centers Vaccination in Pune City)

कोव्हीशील्डची लस ५४ केंद्रांवर तर कोव्हॅन्सीची लस १५ केंद्रावर असणार आहे, प्रत्येक केंद्रावर १०० लसीचे डोस उपलब्ध आहेत. कोव्हॅक्सीनची लस ही दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांनाच दिली जाणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

हेही वाचा: Pune Corona Update: दिलासा! शहरात रुग्णसंख्या हजारच्या आतच

१२ हजार जणांचे लसीकरण

शहरात महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये मिळून बुधवारी ११ हजार ९६९ जणांचे लसीकरण झाले. महापालिकेचे लसीकरण दोन दिवसानंतर उघडले होते. त्यामुळे सकाळपासून कोव्हीशील्ड आणि कोव्हॅक्सीनची लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. खासगी केंद्रांच्या बाहेर देखील रांगा लागलेल्या होत्या, खासगी रुग्णालयांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील ३ हजार ३४२ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

दिवसभरात झालेल्या लसीकरणात आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये २१९ जणांनी पहिला तर ८४ जणांनी दुसरा डोस घेतला. फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांमध्ये ४९० जणांनी पहिला २०९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. २ हजार ५० ज्येष्ठ नागरिकांनी पहिला तर ४३८ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ ते ५९ वयोगटात ४हजार ६२५ जणांनी पहिला, ५१२ जणांनी दुसरा डोस घेतला. तर १८ ते ४४ वयोगटात ३ हजार ३४२ जणांनी पहिला डोस घेतला आहे.

हेही वाचा: पुणे शहर व जिल्ह्यातील नद्यांमधील अतिक्रमणे काढण्याचा आदेश

असे असेल आजचे लसीकरण

- कोव्हीशील्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवसांपूर्वी (३ मार्च ) घेणाऱ्या नागरिकांना दुसरा डोस मिळेल.

- दुसऱ्या डोससाठी २० टक्के लस उपलब्ध

- पहिल्या डोससाठी ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांसाठी ६० टक्के डोस उपलब्ध

- ऑनलाईन बुकिंग गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरू होईल. - पहिल्या डोससाठी थेट लसीकरण केंद्रांवर जाणारे आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन कर्मचारी व ४५ च्या पुढील नागरिकांसाठी २० टक्के डोस राखीव

- २९ एप्रिलपूर्वी पहिला डोस घेणाऱ्यांना कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस दिला जाईल.

- ११५ केंद्रांवर प्रत्येकी १००डोस देण्यात आले आहेत.