Vidha Sabha 2019 : पुण्यात आज पदयात्रा, सभा अन्‌ मेळावे

Vidha Sabha 2019 : पुण्यात आज पदयात्रा, सभा अन्‌ मेळावे

विधानसभा 2019 
पुणे - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रविवारच्या (ता. १३) सुटीचा फायदा घेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांनी कंबर कसली आहे. रात्री उशिरापर्यंत पदयात्रा, सभा आणि मेळाव्यांचे नियोजन करण्यात आले आहे. 

गेल्या रविवारी (ता. १३) पाऊस झाल्याने उमेदवारांना प्रचार करता आला नाही. त्यामुळे या रविवारच्या सुटीचे निमित्त साधत मतदारांना भेटण्यासाठी उमेदवारांकडून खटाखोट सुरू आहे. सकाळी तळजाई टेकडी, सारसबाग यासह इतर उद्यानांमध्ये फिरण्यासाठी आलेल्या मतदारांशी संवाद साधण्यासाठी उमेदवारांनी नियोजन केले आहे. भाजपतर्फे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद हे कोथरूड येथील हर्षल लॉन्स येथे सकाळी ११ वाजता दिव्यांगांचा मेळावा घेणार आहेत. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची सातारा रस्ता येथील वाळवेकर लॉन्स येथे दुपारी दोन वाजता सभा आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची बाणेर येथे सायंकाळी ६ वाजता सभा होणार आहे. हडपसर मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांचा सकाळी आठ वाजता मुंढवा येथून रोड शो सुरू होणार असून, हडपसर गावात तो संपणार आहे. आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय प्रवक्ते राघव चड्डा यांचा खजिना विहीर येथील फडके हॉलमध्ये मेळावा होणार आहे. 

सत्ताधारी भाजपकडून रोज एक केंद्रीय मंत्री, राज्यातील नेते पुण्यात येऊन सभा, मेळावे घेत आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे अनेक नेते अद्याप पुण्यात फिरकलेले नाहीत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com