जुन्या नोटा देऊन पेट्रोल भरण्याचा आज शेवटचा दिवस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

पुणे - पाचशे, हजार रुपयांची जुनी नोट देऊन गुरुवारी (ता. 24) रात्री बारापर्यंतच नागरिकांना पेट्रोल भरून घेता येणार आहे. त्यानंतर देशातील कोणत्याही पेट्रोल पंपावर जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार नाहीत. सुटे पैसे दिल्यावरच पेट्रोल भरून देण्यात येईल, असे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या वतीने प्रवक्ता अली दारूवाला यांनी सांगितले.

जुन्या नोटा चलनातून रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर 24 नोव्हेंबरपर्यंत पंपावर नागरिकांना पाचशे, हजार रुपयांच्या नोटा देऊन पेट्रोल भरून घेण्याची मुभाही देण्यात आली. या घोषणेनंतर नागरिकांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावल्या होत्या. जुन्या नोटा स्वीकारण्याची शेवटची तारीख उद्या संपत असून, त्याला मुदतवाढ देण्यात आलेली नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही असोसिएशनने म्हटले आहे.

Web Title: Today is the last day to pay with the old currency for petrol