मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तासांसाठी बंद

mumbai-pune-expressway
mumbai-pune-expressway

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याकडे जाणारी वाहतूक आज (ता. 10) दोन तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईहून पुण्याकडे द्रुतगती मार्गावर रसायनी जवळ किलोमीटर क्र.18-19 दरम्यान जाणारा मार्ग दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येईल, असे महामार्ग वाहतूक पोलिसांनी सांगितले.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुणे कॉरिडॉर मध्ये खालापूर टोलनाक्याच्या आधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेड व आयआरबी कंपनीच्या वतीने जाहिरात फलकासाठी ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी दोन तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून या दरम्यान पर्यायी मार्ग म्हणून शेडुंग फाटा येथून वाहतूक जुन्या मुंबई- पुणे मार्गावर वळविण्यात येणार असून खालापूर येथे पुन्हा द्रुतगती मार्गावर वाहनचालकांना येता येणार आहे. वाहनचालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन महामार्ग वाहतूक पोलिसांनी केले आहे. या कालावधीत अवजड मालवाहू वाहनांना थांबवून ठेवण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com