पाणीपुरवठा आज बंद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

पुणे - महापालिकेच्या पंपिंग केंद्रांतील देखभाल आणि दुरुस्तीची कामे करायची असल्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. 10) बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे. 

शहराच्या सर्व पेठा, उपनगरांमधील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. टॅंकरमधून पाणी भरण्याची केंद्रेही बंद राहणार आहेत. त्यामुळे शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता आहे. त्याची दखल घेऊन सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Web Title: today No water supply

टॅग्स