पुणे जिल्ह्यात आज दुसऱ्यांदा चार हजारांचा आकडा पार   

गजेंद्र बडे
Sunday, 6 September 2020

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील ९४१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ९२५, नगरपालिका क्षेत्रात ३९०  आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ५८ रुग्णांचा समावेश आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता.५) दिवसभरात ४ हजार ५० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या महिन्यात आज दुसऱ्यांदा दिवसभरातील नव्या रुग्णांचा चार हजारांचा आकडा ओलांडला गेला आहे. यामध्ये  पुणे शहरातील १ हजार ७३६ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, ७९ जणांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील ९४१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ९२५, नगरपालिका क्षेत्रात ३९०  आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ५८ रुग्णांचा समावेश आहे.

गेल्या चोवीस तासांत मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांमध्ये   पुणे शहरातील सर्वाधिक ३७ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील १४, जिल्हा परिषद क्षेत्रातील १७, नगरपालिका  क्षेत्रातील ८ आणि  कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील तीन जणांचा समावेश आहे. नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही काल (ता. ४) रात्री ९ वाजल्यापासून आज (ता. ५) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

पत्रकारांच्या विमा संरक्षणाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिले संकेत; अधिवेशनात मांडणार मुद्दा

दरम्यान, आज दिवसभरात ३ हजार ४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार ४५६, पिंपरी चिंचवडमधील ८२०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५७०, नगरपालिका क्षेत्रातील १५२ आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील ४५ जण आहेत.

(edited by : sharayu kakade)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today in Pune district for the second time the number crossed four thousand corona Positive