अभियांत्रिकी प्रवेशाबाबत आज विशेष मार्गदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

केव्हा - शनिवार, ता. 7 जानेवारी 
कधी - सकाळी 10.30 
कोठे - पुण्याई सभागृह, एमआयटी शाळेसमोर, पीएनजी शोरूमजवळ, पौड रस्ता, कोथरूड, पुणे 
जागा - 500 जागांची मर्यादा 
प्रवेश - एक विद्यार्थी व सोबत एक व्यक्‍ती 
नोंदणी - आजच www.vidyaseminars.com येथे करा 
संपर्क - 9922913510 

पुणे - अभियांत्रिकी क्षेत्रातील संधींबाबत सकाळ विद्या आणि एसआरएम विद्यापीठ, चेन्नईतर्फे शनिवारी (ता. 7) कोथरूडमध्ये विशेष चर्चासत्र आयोजित केले आहे. इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनबाबत पालकांच्या मनात अनेक शंका असतात. विद्यार्थ्यांनाही काही प्रश्‍न सतावत असतात. त्या प्रत्येक शंकांचे या ठिकाणी समाधान केले जाणार आहे. 

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या भविष्यातील संधी, विद्यार्थ्यांच्या समस्या, विद्यापीठातर्फे दिली जाणारी स्कॉलरशिप आणि राबविण्यात येणारे प्लेसमेंट शिबिर, प्रवेशपरीक्षा अशा प्रत्येक टप्प्यांवरच्या प्रश्‍नांवर यात चर्चा होणार आहे. या सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळावीत म्हणून "सकाळ'ने डॉ. लीनस मार्टिन (विभाग प्रमुख, ऑटोमोबाईल विभाग, एसआरएम युनिव्हर्सिटी) या शिक्षण तज्ज्ञांसोबत विशेष चर्चासत्र आयोजित केले आहे. यासाठी उपस्थित राहणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजचे आयकार्ड दाखविल्यास त्यांना एसआरएम युनिव्हर्सिटीचे 1 हजार 70 रुपये किमतीचे प्रॉस्पेक्‍ट्‌स व ऍप्लिकेशन फॉर्म मोफत दिले जाईल. 

हेमचंद्र शिंदे हे इंजिनिअरिंगमधील प्रवेशप्रक्रियेबाबत विशेष मार्गदर्शन करणार आहेत. बारावीचे विद्यार्थी व पालकांना मोफत प्रवेश दिला जाणार असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. 

Web Title: Today Special guidance engineering admission