कुरुळीत भूमिगत गटरलाइनचे उद्‌घाटन

कुरुळीत भूमिगत गटरलाइनचे उद्‌घाटन

कुरुळी, ता. ५ : येथील (ता.खेड) घाडगेवस्ती ते निघोजेरस्ता येथील प्रलंबित असणाऱ्या सांडपाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत गटरलाइनच्या कामाचे उद्‌घाटन सरपंच कविता गायकवाड, उपसरपंच विशाल सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. दोन फूट व्यासाचे तीनशे फूट सिमेंटपाइप टाकण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल यांनी सांगितले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य नितीन कड, नेहा बागडे, शोभा गायकवाड, प्रतिभा कांबळे, ग्रामस्थ राजू गायकवाड, निवृत्ती घाडगे, हेमंत काळडोके, अजित गायकवाड, बाबा गायकवाड, नितीन गायकवाड, नारायण गायकवाड, सत्यवान गायकवाड, किरण गायकवाड, अक्षय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
------------------------
00944

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com