वाणेवाडी येथील सोसायटीच्या अध्यक्षपदी भोसले

वाणेवाडी येथील सोसायटीच्या अध्यक्षपदी भोसले

सोमेश्वरनगर, ता. २२ ः वाणेवाडी (ता. बारामती) येथील यशवंतराव भोसले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी रमेश शिवाजीराव भोसले तर उपाध्यक्षपदी सोमनाथ जयसिंग चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिवंगत शिवाजीराव भोसले यांनी सत्तावीस वर्षापूर्वी यशवंतराव सोसायटीची स्थापना केली होती. तेव्हापासूनची सलग बिनविरोध निवडणुकीची परंपरा सभासदांनी कायम ठेवली आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळात रमेश शिवाजीराव भोसले, प्रवीण शिवाजीराव भोसले, अजित रामचंद्र भोसले, विजय बुवासाहेब भोसले, संजय व्यंकटराव भोसले, भोजराज नारायण भोसले, मोहन संपतराव भोसले, सोमनाथ जयसिंग चव्हाण, बाळासाहेब संपतराव फरांदे, दत्तात्रेय खंडेराव कोकरे, मनिषा अनिल भोसले, सजाबाई बापूराव भोसले यांचा समावेश झाला होता. नुकतीच शिवाजीराव भोसले यांच्या पुत्रावर अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली तर अनुभवी सभासद चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com