भीमा नदीवरील गणेशवाडी - गारअकोले पूल धोकादायक

भीमा नदीवरील गणेशवाडी - गारअकोले पूल धोकादायक

Published on

नीरा नरसिंहपूर, ता.२२ ः पुणे व सोलापूर जिल्ह्यातील गावांना जोडणाऱ्या भीमा नदीवरील गणेशवाडी (ता. इंदापूर) व गारअकोले (ता. माढा) येथील पुलावरील लोखंडी संरक्षक कठड्याची दुरवस्था झाली आहे, तसेच दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे.
माढा तालुक्यातील भीमाकाठच्या गावांतील नागरिकांना बावडा अकलूजकडे तर इंदापूर तालुक्यातील नागरिकांना रांजणी, भीमानगर (उजनी), टेंभुर्णीकडे याच पुलावरून ये- जा करावी लागते. या पुलाचे लोखंडी कठडे वारंवार येणाऱ्या पुरामुळे तुटून गेलेले आहेत. काही लोखंडी बार हे चोरट्यांनी चोरून नेले आहेत. त्यामुळे प्रवास करताना अपघाताची भीती असल्याचे राहुल बागल व श्रेयस बागल (गणेशवाडी) यांनी सांगितले. कोंडार पट्ट्यातील गावातील शेकडो विद्यार्थ्यांना याच पुलावरून शाळेला जाण्यासाठी धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
भीमा नदीकाठ उसाचे आगर असल्याने उसाच्या वाहनांची या पुलावरून मोठी वर्दळ सुरू असते. वर्दळीच्या पुलास बांधकाम विभागाच्या सततच्या दुर्लक्षामुळे अनेकदा अपघातास सामोरे जाण्याची वेळ आली आहे. सध्या टणू बंधाऱ्यात पाणी अडवण्यात आले असल्याने पुलाखाली बंधाऱ्याच्या पाण्याचा सात ते दहा फूट उंचीचा फुगवटा झाला आहे. त्यामुळे पुलावरून दिवसरात्र सुरू असलेला वाहन प्रवास धोकादायक झाला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांना मोठे खड्डे पडल्याने मोठी दुरवस्था झाली आहे.

निधी मंजूर पण...

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी या पुलाच्या दुरवस्थेमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी कोंडार पट्ट्यातील नागरिकांच्या मागणीनुसार पुलाच्या व रस्त्याच्या तातडीने दुरुस्ती करण्यासाठी दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र ते काम अद्याप सुरू झालेले नाही. ते काम तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
NPR22B02373

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com