‘प्रायमा कंपनी’ला कराची थकबाकी भरणे बंधनकारक शिरूरचे गटविकास अधिकारी विजय नलावडे यांचा आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘प्रायमा कंपनी’ला कराची
थकबाकी भरणे बंधनकारक 
शिरूरचे गटविकास अधिकारी विजय नलावडे यांचा आदेश
‘प्रायमा कंपनी’ला कराची थकबाकी भरणे बंधनकारक शिरूरचे गटविकास अधिकारी विजय नलावडे यांचा आदेश

‘प्रायमा कंपनी’ला कराची थकबाकी भरणे बंधनकारक शिरूरचे गटविकास अधिकारी विजय नलावडे यांचा आदेश

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. ७ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील ‘प्रायमा पेपर ॲण्ड इंजिनिअर’ या कंपनीला ग्रांमचायतीने आकारलेला कर भरणे बंधनकारक असून त्यात कोणतीही सूट देता येणार नाही, असा आदेश गटविकास अधिकारी विजय नलावडे यांनी दिला आहे. पंचायत समितीने कर भरण्यासंदर्भातील पत्र कंपनी व्यवस्थापन व ग्रामपंचायतीला नुकतेच पत्र दिले आहे.

प्रायमा कंपनीकडे २०१२ पासून ते अद्यापपर्यंत १ कोटी ५५ लाख ९४ हजार ९०७ रुपये इतकी थकबाकी असल्याचे सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच नवनाथ ढमढेरे व ग्रामपंचायत सदस्य अनिल भुजबळ यांनी सांगितले.

याबाबत अनिल भुजबळ म्हणाले की, ग्रामपंचायतीने कर वसुलीसाठी कंपनीकडे वारंवार मागणी केली व नोटिसा दिल्या. परंतु थकबाकी भरण्यासाठी कंपनीने प्रतिसाद दिला नाही. अखेर ग्रामपंचायतीने गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. यामध्ये कंपनीच्या थकीत कराची माहिती देण्यात आली. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी पत्राद्वारे सर्व थकबाकी ग्रामपंचायतीने मागणी केल्यानुसार कंपनीने भरावा असा आदेश दिला आहे.’’

कंपनीने कराची थकबाकी भरल्यास गावच्या विकासाला मोठा हातभार लागणार असून शासकीय नियमानुसार आकारलेला कर भरणा त्वरित ग्रामपंचायतीकडे करणे अपेक्षा असल्याचे अंकिता भुजबळ व उपसरपंच नवनाथ ढमढेरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top