onion cultivation
onion cultivationsakal

कांदा लागवडीसाठी खेड तालुक्यात मिळेनात मजूर

खेड तालुक्यात यंदा कांदा लागवडीसाठी लागणाऱ्या मजुरांच्या टंचाईने शेतकरी हवालदिल झाले आहेत. खेड तालुक्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
Summary

खेड तालुक्यात यंदा कांदा लागवडीसाठी लागणाऱ्या मजुरांच्या टंचाईने शेतकरी हवालदिल झाले आहेत. खेड तालुक्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

चाकण - खेड तालुक्यात (Khed Tahsil) यंदा कांदा लागवडीसाठी (Onion Cultivation) लागणाऱ्या मजुरांच्या (Labour Shortage) टंचाईने शेतकरी (Farmer) हवालदिल झाले आहेत. खेड तालुक्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शेतकऱ्यांचे अर्थकारण हे पूर्णपणे कांदा पिकावरच अवलंबून असते. शेतकरी रब्बी हंगामातील कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मोजक्याच महिला, मजूर कांदा लागवडी करतात. त्यामुळे मजूर टंचाई निर्माण झाली आहे.

लागवडीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पळापळ होत असून शेतकरी चिंतेत आहे. मागणीच्या तुलनेत मजूर पुरवठा होत नसल्याने मजुरीचा दर वाढला आहे. मजुरांच्या टोळ्यांचा शोध शेतकऱ्यांना घ्यावा लागत आहे. तसेच त्यांना अधिक मजुरी द्यावी लागत आहे.

वाफे तयार करण्यासाठी एका एकराला आठ ते नऊ हजार मजुरीचे दर घेतले जात आहेत. मजूर मिळत नसल्यामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, मावळ तालुक्यात काही शेतकरी रात्रीची कांदा लागवड करत आहेत. पण रात्रीच्या लागवडी थंड हवामानामुळे सध्या थंडावल्या आहेत, असे शेतकऱ्यांनी सांगितले. महिला मजुरांना मजुरी अगदी पाचशे ते सातशे रुपये द्यावी लागत आहे.

कोरोनाचे ८८ मृत्यू, मदत १५ जणांनाच!

कांद्याचे बियाणे टाकल्यावर साधारणपणे पावणेदोन महिन्यात रोपे लागवडीसाठी येतात. कांद्याची रोपे लागवडीला आल्यानंतर वेळेत लागवड करावी लागते. कांदा एकरी लागवडीसाठी साधारणपणे दहा हजारावर मजुरीचा खर्च येतो. काही वर्षांपूर्वी मजूर स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात येत होते. मजुरांना शेतावर आणण्यासाठी सध्या ट्रॅक्टर, जीप, रिक्षा आदी वाहनांचा वापर करावा लागत आहे. हा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

रोपे वाचविण्यासाठी धडपड

कांदा लागवडीसाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. कांद्याची रोपे लागवडीसाठी तयार झाली असून ती रोपे बदललेल्या ढगाळ वातावरणामुळे भुरी येऊन सडून खराब होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शेतकरी कांदा रोपांवर औषध फवारणी करून थकले आहेत. मजूर मिळेल याची वाट न पाहता कुटुंबातील व्यक्ती घेऊन कशीबशी कांदा लागवड करत असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी निवृत्ती वाळुंज, बाळासाहेब कड, खेड बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांत इंगवले यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com