ऑनलाइन स्पर्धांमध्ये २४५ जणांचा सहभाग

ऑनलाइन स्पर्धांमध्ये २४५ जणांचा सहभाग

वडगाव मावळ, ता. ३ : स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वडगाव नगरपंचायतीने ऑनलाइन घेतलेल्या विविध स्पर्धांना स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धांमध्ये २४५ जणांनी सहभाग घेतला.
नगरपंचायतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविध कलात्मक स्पर्धा तसेच शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. येथील शासकीय विश्रामगृहात पारितोषिक वितरण समारंभ झाला. जिल्हा बँकेचे संचालक माऊली दाभाडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर, उपनगराध्यक्षा शारदा ढोरे, नगरसेविका पूनम जाधव, चंद्रजित वाघमारे आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे ः निबंध स्पर्धा- पाचवी ते बारावी ः प्रथम- चैतन्य भोरे, द्वितीय- समर्थ पुंडे, तृतीय- सार्थक बारावकर, चित्रकला स्पर्धा ः पहिली ते चौथी- प्रथम- रिदीमा ठोंबरे, द्वितीय-श्लोक जाजू, तृतीय-आयेशा शेख. पाचवी ते दहावी- प्रथम- गार्गी ढोरे, द्वितीय- अतिष गिरे, तृतीय- संस्कार शिंदे, १२ वी ते खुला गट- प्रथम- दामिनी वाघवले, द्वितीय- जोत्स्ना जैन, तृतीय- कविता मोरे, जिंगल स्पर्धा (खुला गट)-प्रथम- सुषमा जाजू, द्वितीय- वसुमती दांडगे, तृतीय- वैशाली टोपणे, वक्तृत्व स्पर्धा (खुला गट)- प्रथम- प्रणोती कुंभार, द्वितीय- साक्षी जोगळेकर, तृतीय- रोहिणी भोरे, वक्तृत्व स्पर्धा गटनिहाय निकाल- पहिली ते सातवी- प्रथम- शार्वी जाजू, द्वितीय-श्रेया दंडेल, तृतीय- मीनाक्षी धोंगडे, आठवी ते दहावी- प्रथम- समृद्धी शेलार, द्वितीय- अमृता जगताप, तृतीय- भक्ती डोईफोडे, अकरावी ते खुला गट-प्रथम- प्रमिला धोंगडे, द्वितीय- प्रणीत निगडे, तृतीय- विशाखा पाटील. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

‘‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सर्व नागरिकांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावे.’’
- मयूर ढोरे, नगराध्यक्ष वडगाव मावळ


VDM22B03108

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com