सावकाराने व्याजाच्या ८५ हजारांपोटी केली ५९ लाख रुपयांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime case
सावकाराने व्याजाच्या ८५ हजारांपोटी केली ५९ लाख रुपयांची मागणी

सावकाराने व्याजाच्या ८५ हजारांपोटी केली ५९ लाख रुपयांची मागणी

मंचर - सावकारी परवाना न घेता अवैध सावकारी व्यवसाय (Money Lender Business) करत असल्याच्या आरोपावरून मंचर पोलिसांनी (Police) भीमाजी तुकाराम पोखरकर व भरत तुकाराम पोखरकर (दोघेही रा. चांडोली खुर्द, ता. आंबेगाव) या दोन सख्ख्या भावांविरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल केला आहे. व्याजाने घेतलेल्या ८५ हजार रुपये रक्कमेपोटी केलेले जमिनीचे साठेखत रद्द करण्यासाठी तब्बल ५९ लाख रुपयांची मागणीचा तगादा सावकाराने लावला होता.

याबाबत मंचर येथील सहायक निबंधक सहकारी संस्था अधिकारी मनीषा अवधूत जरे यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) येथील अर्जदार नाना नामदेव इंदोरे यांनी सन १९९६ मध्ये भीमाजी पोखरकर यांच्याकडून ८५ हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्या मोबदल्यात चांडोली खुर्द येथील गट नंबर २१०/१ या शेतजमिनीचे साठेखत सावकार भीमाजी पोखरकर यांचे बंधू भरत पोखरकर यांच्या नावे करून घेतले. तसेच, नाना इंदोरे यांच्याकडून साधना सहकारी बँकेचे कोरे धनादेश व सह्या केलेले कोरे स्टॅम्प घेतले.

हेही वाचा: खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर सुटलेल्या मुलासह वडिलांचा खून

वेळोवेळी चार लाख ३४ हजार रुपये एवढी रक्कम इंदोरे यांनी सावकाराला देऊनही वारंवार पैशाचा तगादा लावला. जमिनीचे साठेखत रद्द करण्याच्या बदल्यात पैशाची मागणी केली. याबाबत नाना नामदेव इंदोरे यांनी सावकार निबंधक तथा सहायक निबंधक सहकारी संस्था मंचर यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला. त्यानुसार सहकार खात्याच्या दोन पथकांनी पंच व पोलिसांच्या समक्ष भीमाजी पोखरकर याच्या राहत्या घरी छापा टाकला. त्यावेळी अवैध सावकारीबाबत संशयास्पद कागदपत्र, धनादेश, करारनामा, छायांकित प्रत मिळाली. या प्रकरणी पुढील तपास मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलिस करत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top